“दु:ख हेच आहे की एका माणसाच्या राक्षसी महत्त्वकांक्षेसाठी महाराष्ट्र मागे पडतोय”; मुख्यमंत्री शिंदेंवर आदित्य ठाकरेंचे टीकास्त्र!

महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना दिली प्रतिक्रिया, जाणून घ्या आणखी काय म्हणाले आहेत.

याचबरोबर “कालदेखील मी एक महत्त्वाचा विषय आपल्या समोर आणला तो म्हणजे वेदांता फॉक्सकॉनला लिहिलेलं पत्र होतं. अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक घडामोडी आहेत जिथे शेतकऱ्यांना न मिळालेली मदत असेल, पीक विम्याचा विषय असेल, यावर आम्ही अर्थात चर्चा तर करतच होतो. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे चर्चा न करूनही महाराष्ट्राच्या डोळ्यासमोर सर्व घडामोडी होत आहेत. दु:ख हेच आहे की एका माणसाच्या राक्षसी महत्त्वकांक्षांसाठी महाराष्ट्र मागे चाललेला आहे.” असं म्हणत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री 

हे वाचले का?  ”शरद पवारांनी मराठा समाजाचे वाटोळे केले”; मनोज जरांगेंचं टीकास्र; म्हणाले, ”त्यांना जमलं नाही म्हणून…”

याशिवाय, मुंबईत पसरत असलेल्या गोवरच्या साथीबाबत बोलताना आदित्य ठाकरेंनी म्हटले की, “आजपण मी वाचलं आहे की बारा मुलांचा मृत्यू झालेला आहे. मात्र सरकारकडू किंवा मंत्र्यांकडून काहीही बुलेटीन आलेलं नाही. अद्यापही कुठलही ब्रिफिंग झालेलं नाही, जसं आम्ही हाताळत होतो. प्रत्येक दिवशी बुलेटीन यायचं. मुख्यमंत्री स्वत: फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सगळ्यांशी संवाद साधायचे. तसं कुठेही सत्य परिस्थिती लोकांच्या समोर आलेली नाही. दुसऱ्या बाजूला सचिवांची बदली होते, तसेच जर आपण बघितलं तर एकंदरितच केंद्र सरकारकडून एक सूचना आलेली आहे, ज्यात सांगितलेलं आहे की महाराष्ट्राने जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. अशी नोट कधी कोविडच्या काळात आली नव्हती.”

हे वाचले का?  LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…