देवेंद्र फडणवीसांवर बीडमधल्या सभेत मनोज जरांगेंची टीका
काहीही झालं तरीही मी माझं इमान विकणार नाही. आपल्यातल्या काही हरा### अवलादी फोडल्या. आज मराठ्यांच्या अवलादी नसल्यासारखं काही लोक वागत आहेत. काही लाखांसाठी फुटून हे लोक विरोधात बोलत आहे. मी चुकीची बाजू लावून धरलेली नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी आज बीडच्या सभेत म्हटलं आहे. काही वेळापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी बीडमध्ये सभा घेतली. त्या सभेत त्यांनी फुटलेल्या लोकांवर टीका केली. तसंच देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी इशारा दिला आहे.