देशातील करोना रुग्णसंख्या चिंता वाढवणारी; केरळ आणि महाराष्ट्रातून सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद

देशातील एकूण करोनाबाधित रुग्णसंख्या ३ कोटी १५ लाख ७२ हजार ३४४ वर पोहोचली आहे

देशात गेल्या २४ तासात ४४ हजार २३० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यासोबतच देशातील एकूण करोनाबाधित रुग्णसंख्या ३ कोटी १५ लाख ७२ हजार ३४४ वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. सर्वाधिक करोना रुग्णसंख्या नोंदवणाऱ्या राज्यांमध्ये केरळ पहिल्या क्रमांकावर असून महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे.

केरळमधील परिस्थिती चिंताजनक असून २४ तासात २२ हजार ६४ रुग्णांची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे महाराष्ट्रात ७२४२ रुग्णांची नोंद झाली. यानंतर आंध्रपदेश (२१०७), कर्नाटक (२०५२) आणि तामिळनाडूचा (१८५९) क्रमांक आहे. जवळपास ८० टक्के रुग्णांची या पाच राज्यांमधून झाली असून एकट्या केरळमधून ५० टक्के रुग्णांची नोंद झाली आहे.

हे वाचले का?  Tahawwur Rana Extradiction : २६/११ मुंबई हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणा डिसेंबर अखेरीस भारताच्या ताब्यात?

दरम्यान देशात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या वाढली आहे. देशात गेल्या २४ तासांत १३१५ नवे अॅक्टिव्ह रुग्ण आढळले असून यासोबत एकूण अॅक्टिव्ह रुग्णसंख्या ४ लाख ५ हजार १५५ वर पोहोचली आहे. तसंच गेल्या २४ तासांत ५५५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यासोबत देशात करोनामुळे जीव गमावलेल्यांची संख्या ४ लाख ३२ हजार २१७ झाली आहे.

हे वाचले का?  अन्यथा ‘लाडकी बहीण’ रद्द करू! सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा

दुसरीकडे देशात गेल्या २४ तासांत ४२ हजार ३६९ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. यासोबत आतापर्यंत एकूण ३ कोटी ७ लाख ४३ हजार ९७२ जणांनी करोनावर मात केली आहे. भारताचा रिकव्हरी रेट सध्या ९७.३८ टक्के आहे.