हवामानाच्या महत्त्वाच्या मापदंडांनुसार यावर्षी सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.
भारतात यावर्षी कमी -अधिक प्रमाणात मान्सून बरसत आहे. हवामान खात्याच्या मते, भारतात सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो. नवी दिल्लीतील हवामान विभागाने बुधवारी भारतात सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे जुलै आणि ऑगस्टमध्ये अपुऱ्या पावसाचा सामना करणाऱ्या लाखो शेतकऱ्यांना मदत होईल असे म्हटले आहे. जून महिन्यात सरासरीपेक्षा १० टक्के जास्त मान्सून पाऊस झाला असून ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा २४ टक्के कमी पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाचे (आयएमडी) महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. हवामानाच्या महत्त्वाच्या मापदंडांनुसार यावर्षी सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. मान्सूनची तूट आता ९ टक्क्यांवर आली आहे आणि सप्टेंबरमध्ये चांगल्या पावसामुळे ती आणखी कमी होऊ शकते. ऑगस्टपूर्वी जूनमध्येही सात टक्के कमी पावसाची नोंद झाली होती, असे महापात्रा यांनी म्हटले.
सप्टेंबरमध्ये मध्य भारताच्या अनेक भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. मान्सूनची तूट आता ९ टक्क्यांवर आली आहे आणि सप्टेंबरमध्ये चांगल्या पावसामुळे ती आणखी कमी होऊ शकते. ऑगस्टपूर्वी जूनमध्येही सात टक्के कमी पावसाची नोंद झाली होती. भारतीय हवामान विभाग (IMD) जूनमध्ये सुरू होणारा आणि चार महिने टिकणारा सरासरी किंवा सामान्य मान्सून म्हणून ९६ ते १०४ टक्के दरम्यान पाऊस निश्चित करतो.
मान्सून ३ जून रोजी केरळच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवर धडकल्यानंतर अपेक्षेपेक्षा सुमारे १५ दिवस अगोदर भारताच्या दोन तृतीयांश भागात पसरला होता आणि नंतर जूनच्या तिसऱ्या आठवड्यात कमी झाला. मान्सून काही काळ अत्यंत सक्रिय असूनही जुलै आणि ऑगस्टमध्ये मान्सूनचा पाऊस कमी प्रमाणात राहिला.
“जुलै आणि ऑगस्टमध्ये मान्सून अनियमित झाला होता जूनमध्ये चार महिन्यांचा पावसाळी हंगाम सुरू झाल्यापासून भारताचा एकूण पाऊस सरासरीपेक्षा ९ टक्के कमी आहे. जूनमध्ये हवामान विभागाने म्हटले होते की, या वर्षी भारतात सरासरी मान्सून पाऊस पडण्याची शक्यता आहे,” असे महासंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले.