‘धनुष्यबाणा’च्या गैरवापराबाबत शिंदे गट निवडणूक आयोगाच्या दारी, शिवसेनेची प्रतिक्रिया; म्हणाले “आमदार, खासदारांच्या…”

Shivsena Symbol : शिवसेनेकडून धनुष्यबाणाचा गैरवापर होत असल्याचे सांगत शिंदे गट निवडणूक आयोगाकडे गेला आहे. त्यावर शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांनी भाष्य केलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पक्षात अंतर्गत कलह सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंडखोरी केल्याने शिवसेना पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. त्यामुळे ‘खरी शिवसेना’ कोणाची? याचा निर्णय निवडणूक आयोग घेणार आहे. त्यातच आता शिवसेनेकडून ‘धनुष्यबाण’ चिन्हाचा गैरवापर होत असल्याची तक्रार शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. यावर शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे वाचले का?  Sharad Pawar : अजित पवारांचा शिंदेंना दम? शरद पवारांकडून भर सभेत मिमिक्री; म्हणाले, “शिंदेंनी मला विनंती केली, समजून घ्या…”

“शिंदे गटाने कोणतीही मागणी केली तरी, निवडणूक आयोग ही संवैधानिक संस्था आहे. दोन्ही बाजू जाणून घेतल्यावर आयोग निर्णय देणार. आमदार, खासदार हे राजकीय पक्षातून जन्म घेतात. त्यांच्या माध्यमातून पक्ष तयार होत नसतो. खऱ्या पक्षाला खूप महत्व आयोगाकडे दरबारी असून, त्याला व्यापक व्याख्या आहे. हे सर्व काही तपासून निवडणूक आयोग पाहिल,” असे अनिल देसाई यांनी म्हटल

हे वाचले का?  Ashok Chavan : ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेवरुन भाजपा आणि महायुतीतच एकमत नाही? ‘हे’ तीन नेते काय म्हणाले?

दरम्यान, शिवसेना नेमकी कोणीची या वादातील महत्त्वाचा मुद्दा असणाऱ्या ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हा संदर्भातील दाव्याबद्दलचे पुरावे सादर करण्यासाठी दोन्ही गटांना केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेली मुदत आज संपुष्टात येत आहे. त्यामुळे आज हा निकाल लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, हा निकाल लावताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या माध्यमातून भरुन घेतलेली प्रतिज्ञापत्र कामी येणार की नाही हा, प्रश्न उपस्थित होत आहे.

हे वाचले का?  फेसबुकवर रिल्स बनवून आमदार होता येत नाही.. शेकापचे माजी आमदार सुभाष पाटील यांची टीका