नवरात्र उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून याकरिता देवीच्या मूर्त्या बनवण्यात मूर्तीकार व्यस्त आहेत.
नवरात्र उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून याकरिता देवीच्या मूर्त्या बनवण्यात मूर्तीकार व्यस्त आहेत. मात्र मूर्तीसाठी वापरण्यात येणारे रंग महागल्यामुळे यावर्षी मूर्त्यांच्या किमतीत ४० ते ४५ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.
मागील काही दिवसांपासून सतत पाऊस पडतोय. याच कारणामुळे मूर्तीकारांना मूर्त्यांना रंग देताना अडचणीचा सामना करावा लागतोय. येवला शहरातील कारागीर देवीच्या मूर्तीवर अखेरचा हात फिरवण्यात मग्न असल्याचे दिसून येत असले तरी येथील सततच्या पावसामुळे वातावरणात ओलावा आहे. याच कारणामुळे घडवलेल्या मूर्त्या अद्याप ओल्याच आहेत. नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र मूर्तीकारांना मूर्त्यांवर रंग चढवण्यास अडचणी येत आहेत. दुसरीकडे मूर्तीसाठी वावरण्यात येणारे रंगही या वर्षी महागले आहेत. त्यामुळे देवीच्या मूर्तींच्या किमतीमध्ये ४० ते ४५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तशी माहिती येवला येथील मूर्तीकारांनी दिली आहे.
दरम्यान, अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवमीपर्यंत शारदीय नवरात्र साजरी होते. यंदा २६ सप्टेंबर २०२२ पासून ते ४ ऑक्टोबरपर्यंत नवरात्रीच्या तिथी आहेत. यंदा करोननांतर पहिल्यांदाच गणेशोत्सव अगदी धामधुमीत पार पडला. त्यामुळे नवरात्रोत्सवही तेवढ्याच धामधुमीत पार पडणार आहे.