नाशिकमधील नोटछपाई पाच दिवसांसाठी बंद

cash, currency, financial
Photo by F1Digitals on Pixabay

नाशिकमधील चलन मुद्रणालयात (Currency Note Press Nashik) आणि परिसरात करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नोटछपाई पाच दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मुद्रणालयातील ४० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना करोना विषाणूची लागण झाली आहे. एकूण कर्मचाऱ्यांपैकी दोन टक्के कर्मचारी करोनाबाधित झाल्यामुळे गुरुवारपर्यंत कामकाज बंद ठेवण्यात आलं आहे. चलनी नोटा, मुद्रांक, टपाल तिकिटे, पारपत्र यांची छपाई करणाऱ्या येथील चलार्थपत्र (सीएनपी) आणि भारत प्रतिभूती या दोन्ही मुद्रणालयांत करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने येथील नोटा छपाई, मुद्रांक, पारपत्र छपाई बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती आय.पी.एस मजदूर संघाचे पदाधिकारी जगदीश गोडसे यांनी दिली.

हे वाचले का?  Priyanka Gandhi Vadra Net Worth : आठ लाखांची होंडा सीआरव्ही, सोनं-चांदी अन्…; प्रियांका गांधी वाड्रा यांची एकूण संपत्ती किती?

मुद्रणालयांतील साडेतीन हजारांहून अधिक कामगार तणावाखाली आहेत. मुद्रणालयापासून जवळच्या वसाहतीत करोनाबाधितांची संख्या वाढल्याने मनपाने हे क्षेत्र प्रतिबंधित म्हणून जाहीर केले आहे. या भागात अनेक कामगार राहतात. नाशिकरोड परिसरासह चार तालुक्यांतील कामगार मुद्रणालयात कामावर ये-जा करतात. मुद्रणालयातही शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जात नसल्याकडे निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर महाप्रबंधकाशी चर्चा झाल्यानंतर करोनाची साखळी खंडित करण्यासाठी मुद्रणालय बंद राहणार आहे.

हे वाचले का?  कमी बससंख्येमुळे पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंब

उत्पादनाला बाधा न येण्यासाठी कामाचे दिवस आणि सुटय़ांची जोडणी करत सुटय़ांबाबत स्थानिक व्यवस्थापनावर निर्णय सोडण्यात आला होता. त्याप्रमाणे मजदूर संघ आणि दोन्ही मुद्रणालयांच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक होऊन रविवारपासून ३ सप्टेंबपर्यंत काम बंद ठेवण्यात आलं आहे. रविवारी साप्ताहिक सुट्टी आहे. त्यानंतर सोमवारी, मंगळवारी गणेश विसर्जनाची सुटी आणि मुख्य कार्यालयाकडून प्राप्त सूचनेनुसार दोन दिवस असे चार दिवस काम बंद राहणार आहे. या काळात आवश्यक पुरवठा पाठविण्याची गरज असल्यास किंवा इतर महत्त्वाचे काम असल्यास संबंधित कामगार कामावर येतील. ४ सप्टेंबर रोजी दोन्ही मुद्रणालये नियमित सुरू होणार आहेत.

हे वाचले का?  नाशिक : सप्तश्रृंग गडासाठी जादा बससेवा