नाशिकमध्ये मंगळवारपासून कडक लॉकडाउन; महापालिका आयुक्तांची माहिती

सर्व दुकानं राहणार बंद

राज्यात लॉकडाउन सदृश्य कडक निर्बंध असले, तरी करोना संसर्गाचा प्रसार आणि रुग्णवाढ यावर अपेक्षित परिणाम झाला नसल्याचेच चित्र आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात शहरी भागासह ग्रामीण भागातही करोनाचा प्रसार वेगानं होत असून, रुग्णसंख्या वाढत आहे. आधीच आरोग्य सुविधांवर अतिरिक्त ताण येत असून, त्यात नव्या रुग्णसंख्येमुळे चिंतेत भर पडत आहे. त्यामुळे आता जिल्हास्तरावर कडक लॉकडाउनचा निर्णय घेण्याकडे कल वाढला असून, नाशिक शहरातही लॉकडाउन लावला जाणार आहे. १२ मेपासून हा निर्णय लागू केला जाणार आहे.

हे वाचले का?  लाडकी बहीण अभियानासाठी शुक्रवारी नाशिक विभागातून ९०० बस, प्रवासी वाहतुकीला फटका