नाशिकवर पाणी कपातीची टांगती तलवार

सोमवारी महापौरांनी तातडीने पाणीपुरवठा विभागाची बैठक घेऊन आढावा घेतला.

आठवडाभरात पाऊस न झाल्यास दर बुधवारी पाणी पुरवठा बंदचा विचार; आढाव्यानंतरच अंतिम निर्णय

नाशिक : पावसाने पाठ फिरवल्याने टंचाईचे संकट गडद झाले असून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात शहरास ४० दिवस पाणीपुरवठा करता येईल,

इतकाच जलसाठा आहे. त्यामुळे रविवारपर्यंत धरण क्षेत्रात पाऊस न झाल्यास पुढील आठवड्यापासून एक दिवस म्हणजे दर बुधवारी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा विचार सत्ताधारी भाजपने सुरू केला आहे. अर्थात पुढील सोमवारी आढावा घेऊन याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. पावसाअभावी धरणातील जलसाठा कमी होत आहे. नगरसेवकांच्या आग्रहामुळे महिनाभरापूर्वी महापौर सतीश कुलकर्णी यांनी कपातीचा निर्णय टाळला होता.

पाटबंधारे विभागाने पत्र देऊनही महापालिकेने कपात केली नाही. ही बाब लक्षात आल्यावर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पाऊस आणखी लांबल्यास लातूरसारखी भयावह स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे सर्वत्र पाण्याचा काटेकोरपणे वापर होण्याची गरज असून टंचाईचे संकट उद््भवल्यास शेवटी जबाबदारी तुमची राहील, अशा शब्दात भाजपला फटकारले होते.

हे वाचले का?  Samruddhhi Highway : समृद्धी महामार्गावरील ८ किमीच्या बोगद्याची खासियत, इगतपुरी ते कसारा अंतर अवघ्या १० मिनिटांत कापलं जाणार

या घटनाक्रमानंतर सोमवारी महापौरांनी तातडीने पाणीपुरवठा विभागाची बैठक घेऊन आढावा घेतला. गंगापूर धरणात सद्यस्थितीत १९०० दशलक्ष घनफूट पाणी आहे. त्यातील ८०० दशलक्ष घनफूट मृतसाठा आहे. उर्वरित ३०० दशलक्ष घनफूट आवर्तनासाठी राखीव तर २०० दशलक्ष घनफूट महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळासाठी राखीव आहे. म्हणजे महापालिकेसाठी सध्या धरणात केवळ ६०० दशलक्ष घनफूट पाणी आहे. त्याद्वारे ४० दिवस शहराला पाणीपुुरवठा करता येईल. ही माहिती समोर आल्यानंतर महापौरांनी रविवारपर्यंत पावसाची प्रतीक्षा करण्याचे ठरविले आहे. रविवारपर्यंत पाऊस न झाल्यास पुढील आठवड्यापासून दर बुधवारी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवला जाईल. सोमवारी आढावा घेऊन त्यावर शिक्कामोर्तब केले जाईल, असे महापौर कुलकर्णी यांनी सांगितले. दुष्काळी स्थितीत दैनंदिन पाणीपुरवठ्यात काही अंशी कपात करण्याऐवजी आठवड्यातील एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याने अधिक बचत साधता येते. याआधी टंचाईच्या काळात तसा निर्णय घेतला गेलेला आहे.

हे वाचले का?  लाच स्वीकारताना वेतन भविष्य निर्वाह निधी पथकची महिला अधिकारी जाळ्यात

कपातीची धास्ती

महापालिकेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. करोना संकटात पाणीटंचाईचे दुहेरी संकट नको, असा आग्रह याआधी नगरसेवकांनी धरला होता. तेव्हा महापौरांनी कपातीचा निर्णय टाळला. परंतु, पाऊस लांबल्यास आणि पुढील काळात गंभीर स्थितीला तोंड द्यावे लागल्यास त्याचे खापर भाजपवर फुटेल, हे लक्षात घेऊन महापौर सतीश कुलकर्णी यांनी गांभीर्याने विचार सुरू केला. पुढील सहा दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास पुढील आठवड्यापासून एक दिवस म्हणजे बुधवारी शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. राजकीय पातळीवर हा विषय अडचणीचा ठरू शकतो.

हे वाचले का?  Jayakwadi Dam: जायकवाडीसाठी नाशिकमधून आतापर्यंत १७ टीएमसी पाणी, धरणांतील विसर्ग मंदावला
  •    गंगापूर धरणात १९०० दशलक्ष घनफूट जलसाठा
  •    महापालिकेसाठी राखीव ६०० दशलक्ष घनफूट
  •   राखीव जलसाठ्यातून शहरास ४० दिवस पाणी पुरवठा शक्य
  •    ३०० दशलक्ष घनफूट आवर्तनास तर २०० ‘मऔविमं’साठी राखीव
  •  उर्वरित ८०० दशलक्ष