नाशिक: आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरुंचा विद्यार्थ्यांना दिलासा

वैद्यकीय क्षेत्रासाठी महत्वपूर्ण असलेली नीट परीक्षा आणि यूजीसी घोटाळ्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.

नाशिक: वैद्यकीय क्षेत्रासाठी महत्वपूर्ण असलेली नीट परीक्षा आणि यूजीसी घोटाळ्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता पसरली असताना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुंनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना सर्वकाही ठीक होईल, असा दिलासा दिला आहे.

हे वाचले का?  ११ हजार उच्चशिक्षित पोलीस भरतीच्या शर्यतीत….

वैद्यकीय क्षेत्रात महत्वपूर्ण असलेल्या नीट परीक्षेत झालेल्या गैरप्रकारांची व्याप्ती दिवसागणिक वाढत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. पेपरफुटीसह यामध्ये झालेला आर्थिक गैरव्यवहार, काही ठराविक विद्यार्थ्यांना दिलेले गुण यासह अन्य काही कारणांमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. यामुळे परीक्षा पुन्हा एकदा घेण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. नीटसह अन्य काही परीक्षांमध्ये झालेल्या गोंधळामुळे पुन्हा परीक्षा होईल, गुणांचे पुनर्मूल्यांकन होईल की अन्य काही पर्याय पुढे येतील, यासंदर्भात विद्यार्थ्यांच्या मनात भीती आहे. करोनासारख्या आपत्कालीन परिस्थितीतून आपण पर्याय शाेधत बाहेर पडलो. तसेच, या वातावरणातूनही बाहेर पडू. विद्यार्थी आरोग्य विद्यापीठाच्या वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हे वाचले का?  ५० कोटींच्या कर्जांसाठी लाखोंचा खर्च, प्रदीर्घ काळापासून एकच लेखा परीक्षक – मविप्र वार्षिक सभेत गोंधळ