दुष्काळाच्या छायेत पिण्याच्या पाण्याबरोबर लहान-मोठ्या ११ लाखांहून अधिक जनावरांना चारा पुरविण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
नाशिक : दुष्काळाच्या छायेत पिण्याच्या पाण्याबरोबर लहान-मोठ्या ११ लाखांहून अधिक जनावरांना चारा पुरविण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात सहा महिने पुरेल इतकाच चारा उपलब्ध आहे. त्यामुळे जंगलांसह इतरत्र उपलब्ध गवत, चारा जिल्ह्याबाहेर नेण्यास लवकरच बंदी घातली जाणार आहे. गाळपेरा क्षेत्रात वैरण लागवडीला प्रोत्साहन दिले जाणार आहे, याउपर कमतरता भासल्यास पालघर आणि विक्रमगडच्या डोंगर माथ्यावरील चाऱ्याचे ७५ किलोचे भारे विकत घेण्याची तयारी पशुसंवर्धन विभागाने केली आहे.