नाशिक जिल्ह्यात गुटखा विरोधी अभियानात १०९ गुन्हे दाखल

अवैधरित्या गुटख्याची विक्री करणाऱ्यांवर १०९ गुन्हे दाखल करण्यात आले असून एक कोटी ३६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक: नाशिक ग्रामीण पोलिसांच्या गुटखा विरोधी अभियानात अवैधरित्या गुटख्याची विक्री करणाऱ्यांवर १०९ गुन्हे दाखल करण्यात आले असून एक कोटी ३६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जिल्ह्यात सद्यस्थितीत पानटपऱ्या, गोदाम, इतर आस्थापनांची कसून चौकशी करण्यात येत आहे. या अभियानादरम्यान १०९ गुन्हे दाखल करण्यात आले असून एक कोटी ३६ लाख सहा लाख ७८५ रुपयांचा गुटखा हस्तगत करण्यात आलेला आहे. ११५ संशयितांना जेरबंद करण्यात आले आहे. नाशिक ग्रामीण घटकांतील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी १२ पथके कार्यरत असून त्यांच्याकडून तसेच स्थानिक पोलीस ठाण्यांकडून सर्व प्रकारच्या अवैध व्यवसायांवर कारवाई करण्यात येत आहे. गुटखा, पानमसाला आणि इतर प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविषयी नागरिकांना काही माहिती असल्यास नाशिक ग्रामीण पोलिसांच्या ६२६२२५६३६३ या मदतवाहिनीवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.

हे वाचले का?  नाशिक: नियमबाह्य कामे केल्यास कारवाई; विभागीय सचिवांचा मुख्याध्यापक, प्राचार्यांना इशारा