नाशिक : द्राक्ष बागायतदाराची १४ लाख रुपयांना फसवणूक

चांदवड तालुक्यातील द्राक्ष उत्पादकाची १४ लाख रुपयांना आर्थिक फसवणूक करण्यात आली.

लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : चांदवड तालुक्यातील द्राक्ष उत्पादकाची १४ लाख रुपयांना आर्थिक फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी वडनेर भैरव पोलीस ठाण्यात तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चांदवड येथील बाळकृष्ण रकिबे (३२) यांच्या शेतातून तीन संशयितांनी निर्यात करण्यात येणारे १९१ क्विंटल ५० किलो द्राक्षे खरेदी केले. द्राक्षे खरेदीसाठी ठरलेले १४ लाख ३६ हजार रुपये न देता रकिबे यांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. रकिबे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. वडनेर भैरव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हे वाचले का?  नाशिक: मैत्रीपूर्ण लढतीची अजित पवारांना धास्ती, स्वकीय इच्छुकांचे प्रस्ताव धु़डकावले