नाशिक : पंचवटीत शनिवारी पाणी पुरवठा बंद

वीज उपकेंद्र आणि पंप हाऊसमधील विद्युतविषयक दुरुस्तीची कामे करण्यासाठी पंचवटीतील अनेक भागात शनिवारी सायंकाळी पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

नाशिक : वीज उपकेंद्र आणि पंप हाऊसमधील विद्युतविषयक दुरुस्तीची कामे करण्यासाठी पंचवटीतील अनेक भागात शनिवारी सायंकाळी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. रविवारी सकाळी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. याबाबतची माहिती मनपाच्या पाणी पुरवठा विभागाने दिली आहे. पंचवटी जलशुध्दीकरण केंद्रातील उपकेंद्र आणि पंप हाऊसमध्ये विद्युतविषयक दुरुस्ती कामे तातडीने करणे आवश्यक आहे. तसेच महावितरण कंपनीला काही कामे करावयाची आहेत.

हे वाचले का?  नाशिक : रस्त्यांवरील मंडपांमुळे वाहतुकीला अडथळा