नाशिक : प्रतिबंधित प्लास्टिक प्रकरणी १४ जणांवर कारवाई

घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ.आवेश पलोड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

शहरात रस्त्यावरीललहान-मोठे विक्रेते, बाजारपेठा, भाजीपाला मंडईत एकल वापर प्लास्टिक बंदी मोहिमेत मंगळवारी १४ जणांवर कारवाई करून ७५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. एकल वापर प्लास्टिकबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या निर्देशानुसार महापालिकेने दर महिन्याला विशेष मोहीम राबविण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार एकल वापर प्लास्टिकच्या पडताळणीसाठी केंद्रबिंदू निश्चित करण्यात आले आहेत. रस्त्यांवरील विक्रेते,स्थानिक बाजारपेठा आदी ठिकाणी मनपाच्या पथकाने पडताळणी केली.

हे वाचले का?  अजित पवार उशीरा आल्याने लाडकी बहीण मेळाव्यास अनुपस्थित

घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ.आवेश पलोड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. त्या अंतर्गत पहिल्या गुन्ह्यासाठी १३ जणांवर कारवाई करण्यात आली. संबंधितांना ६५ हजाराचा दंड करण्यात आला. तर एकल वापर प्लास्टिकबाबत दुसऱ्या गुन्ह्यात एकावर कारवाई करण्यात आली. संबंधितावर १० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. आता रेल्वे स्थानक, विमानतळ, बस स्थानक, घाऊक बाजारपेठ, मॉल, हॉटेल्समध्ये कारवाई केली जाणार आहे. गुरुवारी औद्योगिक क्षेत्रात, शुक्रवारी शहराच्या सीमांवर प्रतिबंधित प्लास्टिकवर कारवाईचे नियोजन करण्यात आल्याचे महानगरपालिकेने म्हटले आहे.

हे वाचले का?  गणेशोत्सवात नाशिकमध्ये मध्यवर्ती रस्त्यांवर वाहतुकीचे निर्बंध – दुपारी तीन ते रात्री १२ वेळेत प्रवेश बंद