नाशिक वेशीजवळ बिऱ्हाड मोर्चाचा विसावा, उपमुख्यमंत्र्यांशी शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील १० हजारपेक्षा अधिक शेतकरी, शेतमजूर या मोर्चात सहभागी झाले आहेत.

नाशिक : आदिवासी शेतकरी, कष्टकऱ्यांच्या जमीनहक्क, जंगलहक्कासह शेतीमालाला रास्तभाव, भूसंपादनास विरोध, गायरान हक्क आदी मागण्यांसाठी सत्यशोधक शेतकरी सभा आणि सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा यांच्या वतीने नंदुरबारपासून मुंबईकडे निघालेला बिऱ्हाड मोर्चा रविवारी नाशिकच्या वेशीवर धडकला. नाशिकजवळील आडगाव परिसरात महामार्गालगत मोर्चा विसावला आहे.

हे वाचले का?  मुसळधार पावसाचा ३८ हजार हेक्टरवरील पिकांना फटका; चांदवड, देवळा, पेठमध्ये सर्वाधिक नुकसान