नाशिक : शनिवारी संपूर्ण नाशिक शहराचा पाणी पुरवठा बंद

मुकणे धरणातून पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य वाहिनीची देखभाल दुरुस्ती आणि व्हॉल्व्ह दुरुस्तीच्या कामाबरोबर गंगापूर धरण पंपिंग केंद्रासह शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांच्या दुरुस्तीचेही काम शनिवारी करण्यात येणार आहे.

नाशिक : मुकणे धरणातून पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य वाहिनीची देखभाल दुरुस्ती आणि व्हॉल्व्ह दुरुस्तीच्या कामाबरोबर गंगापूर धरण पंपिंग केंद्रासह शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांच्या दुरुस्तीचेही काम शनिवारी करण्यात येणार आहे. त्यामुळे या दिवशी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. रविवारी सकाळी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, असे पाणी पुरवठा विभागाने म्हटले आहे.

हे वाचले का?  अजित पवार गटाकडून आमदारांना संधी, चार जणांना एबी अर्ज, तिघे बाकी

नाशिक पूर्व आणि सिडकोसह अनेक भागात मुकणे धरणातून पाणी पुरवठा केला जातो. या धरणातील पाणी ज्या मुख्य वाहिनीद्वारे शहरात आणले जाते, तिच्या देखभाल दुरुस्तीचे काम शनिवारी केले जाणार आहे. यामुळे जवळपास सात प्रभागात पाणी पुरवठा बंद करावा लागणार होता. पाणी पुरवठा विभागाने देखभाल दरुस्तीच्या कामात आणखी विस्तार केला. विविध ठिकाणी पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य वितरण वाहिन्या आणि उपवितरण वाहिन्यांची दुरुस्ती, व्हॉल्व्ह दुरुस्ती व बदलणे आदी देखभाल दुरुस्तीच्या कामांसह पाणी पुरवठा सुरळीत राखण्यासाठी गंगापूर धरण पंपिग केंद्रावर काही कामे याच दिवशी केली जाणार आहेत.

हे वाचले का?  अनुसूचित जमातींमधून आरक्षणासाठी धनगर समाजाचे आंदोलन

परिणामी संपूर्ण नाशिक शहराचा पाणी पुरवठा शनिवारी सकाळी नऊ वाजेपासुन संपूर्ण दिवस होऊ शकणार नाही. रविवारी सकाळी पाणी कमी दाबाने येईल. नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.