नाशिक : शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट, कोषागारातील कोट्यवधींच्या उलाढालीवर परिणाम

संपात राज्य लेखा व कोषागारे कर्मचारी संघटनाही सहभागी झाल्यामुळे शासकीय कोषागारातील ५० ते ६० कोटींची उलाढाल थंडावली.

नाशिक : जुन्या निवृत्ती वेतनासह अन्य मागण्यांसाठी राज्य सरकारी, जिल्हा परिषद-निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर व चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनांनी गुरुवारपासून पुकारलेल्या संपाच्या पहिल्याच दिवशी महसूलसह अनेक शासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प झाले. जिल्हाधिकारी कार्यालयात शुकशुकाट पसरला. संपात राज्य लेखा व कोषागारे कर्मचारी संघटनाही सहभागी झाल्यामुळे शासकीय कोषागारातील ५० ते ६० कोटींची उलाढाल थंडावली. महानगरपालिकेत कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज केले.

हे वाचले का?  फुले दाम्पत्याच्या स्मारकातील शिलालेखात त्रुटी, ओळींमधून ‘शुद्र’ गायब