नाशिक: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी म्हसरुळजवळ जागा; पर्यावरणप्रेमींचा विरोध

कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नवीन वैद्यकीय पदव्युत्तर शासकीय महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न निकाली निघाला असून म्हसरूळ येथे तब्बल ३५ एकर जागा शासनाने उपलब्ध करून दिली असल्याची माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली.

कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नवीन वैद्यकीय पदव्युत्तर शासकीय महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न निकाली निघाला असून म्हसरूळ येथे तब्बल ३५ एकर जागा शासनाने उपलब्ध करून दिली असल्याची माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली. दुसरीकडे, शासनाने जाहीर केलेली जागा वन विभागाची असल्याने पर्यावरण प्रेमींनी या जागेस आक्षेप घेतला आहे.

शहरात आरोग्य विज्ञान विद्यापीठ असले तरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नव्हते. जिल्ह्यात विद्यापीठाचे वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, ही अनेक वर्षाची मागणी होती. वैद्यकीय महाविद्यालयासाठी सरकारने ३४८ कोटी रुपयांचा निधी मंजुर केला. मात्र महाविद्यालय सुरू होण्यासाठी जागेचा प्रश्न होता. हा प्रश्न आता निकाली निघाला आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय आणि त्यास संलग्नित ४३० खाटांचे रुग्णालय सुरु करण्यास शासन मान्यता देण्यात आलेली आहे. या नवीन महाविद्यालय व संलग्नित रुग्णालय यांच्या विस्तारीकरणासाठी म्हसरुळ येथे जागा उपलब्ध करुन देण्यात आली असल्याचे पालकमंत्री भुसे यांनी सांगितले.शासनाच्या निर्णयाचे वैद्यकीय वर्तुळात स्वागत होत असतांना पर्यावणप्रेमींनी ही जागा वनविभागाची असतांना महाविद्यालयासाठी दिलीच कशी, असा प्रश्न उपस्थित केल्याने हा निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

हे वाचले का?  देवळालीत सरावावेळी तोफगोळ्याचा स्फोट, दोन अग्निविरांचा मृत्यू

शासनाचा उफराटा निर्णय

शासनस्तरावरून विद्यापीठाला देण्यात आलेली जागा राखीव वनाची आहे. याबद्दल छगन भुजबळ यांनी विधानसभेत प्रश्नही उपस्थित केला होता. अशा प्रकारे निर्णय घेणे अधिकारी आणि राजकीय नेते यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरेल. राखीव वन असल्याने परस्पर आरोग्य विद्यापीठास देण्याचा प्रयत्न केल्यास अधिकाऱ्यांवर वन कायदा तसेच वनसंवर्धन कायद्यातील अंत्यत कठीण अशा कलमांन्वये कारवाई होऊ शकेल.- अंबरिश मोरे (पर्यावरण प्रेमी)

हे वाचले का?  आदिवासी विद्यार्थ्यांना आता बोलीभाषेत शिक्षण, चौथीपर्यंतच्या क्रमिक पुस्तकांचे १२ स्थानिक भाषांमध्ये रूपांतर

सततच्या पाठपुराव्यानंतर नाशिक येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा मिळाली आहे. याआधीच महाविद्यालयाच्या इमारत बांधकामाला प्रशासकीय मान्यता मिळालेली असल्याने लवकरात लवकर प्रत्यक्षात वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामास सुरूवात होऊन पुढील वर्षापासून वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात यावी.- आ. छगन भुजबळ

शिक येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा मिळाली आहे. याआधीच महाविद्यालयाच्या इमारत बांधकामाला प्रशासकीय मान्यता मिळालेली असल्याने लवकरात लवकर प्रत्यक्षात वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामास सुरूवात होऊन पुढील वर्षापासून वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात यावी.- आ. छगन भुजबळ

हे वाचले का?  अंबड गोळीबार प्रकरणात दीपक बडगुजरचा शोध; पोलिसांची खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची तयारी, ठाकरे गटाचा आरोप