नाशिक: शासन आपल्या दारीची पुन्हा लगबग

शहरात आठ जुलै रोजी होणारा शासन आपल्या दारी उपक्रम पुढे ढकलण्यात आला असून आता तो १५ जुलै रोजी होण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक: शहरात आठ जुलै रोजी होणारा शासन आपल्या दारी उपक्रम पुढे ढकलण्यात आला असून आता तो १५ जुलै रोजी होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर तारीख निश्चित केली जाणार आहे. गंगापूर रस्त्यावरील डोंगरे वसतिगृह मैदानात होणाऱ्या या कार्यक्रमासाठी तब्बल ७५ हजार जणांना बसता येईल, असा भव्य जलरोधक मंडप उभारण्यात येणार आहे. यानिमित्ताने सत्ताधारी पक्षांकडून शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे.

हे वाचले का?  Nashik Rain : नाशिकमध्ये सरासरीच्या ९२.०४ टक्के पाऊस