नाशिक : सहलीसाठी आलेल्या शिक्षकांसह विद्यार्थ्यांचे २० भ्रमणध्वनी लंपास, संशयिताकडून १८ भ्रमणध्वनी जप्त

यवतमाळ जिल्ह्यातील शाळेची सहल आली असता शिक्षकांसह २० विद्यार्थ्यांचे भ्रमणध्वनी गोदाघाटावरील संत गाडगे महाराज धर्मशाळेतून चोरणाऱ्यास भद्रकाली पोलिसांनी अटक केली.

नाशिक – यवतमाळ जिल्ह्यातील शाळेची सहल आली असता शिक्षकांसह २० विद्यार्थ्यांचे भ्रमणध्वनी गोदाघाटावरील संत गाडगे महाराज धर्मशाळेतून चोरणाऱ्यास भद्रकाली पोलिसांनी अटक केली. चोराकडून एक लाख ५० हजार रुपयांचे भ्रमणध्वनी जप्त करण्यात आले आहेत.

यवतमाळ येथील नारायण लीला इंग्लिश मीडियम शाळेचे शिक्षक व विद्यार्थी असे ९४ जण शहरात सहलीसाठी आले होते. शहरातील मंदिरांमध्ये दर्शन घेतल्यानंतर सर्व विद्यार्थी, शिक्षक गोदाघाट येथील श्री संत गाडगे महाराज धर्मशाळेत मुक्कामी थांबले. सर्वांनी आपले भ्रमणध्वनी हे चार्जिंगसाठी लावले होते. धर्मशाळेच्या उघड्या खिडकीतून चोरट्याने एक लाख ६० हजार रुपयांचे २० भ्रमणध्वनी चोरले. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

हे वाचले का?  Nashik Rain : नाशिकमध्ये सरासरीच्या ९२.०४ टक्के पाऊस

भद्रकाली पोलीस चोरीचा तपास करत असताना सागर निकुंभ हा चोरटा द्वारका चौक परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. त्याला ताब्यात घेतले असता सराईत भ्रमणध्वनी चोरटा शफिक शेख (३६, रा. मालेगाव) याच्या मदतीने चोरी केल्याचे त्याने सांगितले. संशयित सागरला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून १८ भ्रमणध्वनी जप्त केले.

हे वाचले का?  नाशिक : पालकमंत्री भुसे -भुजबळ प्रथमच समोरासमोर, लाडकी बहीण योजना आढावा बैठकीचे निमित्त