निवडणुकीसाठी राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण

आगामी विधानसभा निवडणूक शांततेत व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी राज्यातील २०० पेक्षा अधिक पोलीस अधिकाऱ्यांना मुख्य निवडणूक आयुक्त एस. चोकलिंगम यांच्यासह पश्चिम बंगाल व तामिळनाडूतील निवडणूक अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीत विशेष प्रशिक्षण दिले.

नाशिक – आगामी विधानसभा निवडणूक शांततेत व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी राज्यातील २०० पेक्षा अधिक पोलीस अधिकाऱ्यांना मुख्य निवडणूक आयुक्त एस. चोकलिंगम यांच्यासह पश्चिम बंगाल व तामिळनाडूतील निवडणूक अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीत विशेष प्रशिक्षण दिले. हे अधिकारी नंतर आपल्या कार्यक्षेत्रात शिबीर आयोजित करून इतरांना प्रशिक्षित करतील.

हे वाचले का?  माजी अग्निवीरांना दिलेल्या १० टक्के राखीव जागांवरून ठाकरे गटाचं मोदी सरकारवर टीकास्र; म्हणाले, “आरक्षणाच्या लॉलीपॉपने…”

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम, तामिळनाडूचे मुख्य निवडणूक अधिकारी सत्यब्रत साहू आणि पश्चिम बंगालचे आरिझ आफताब यांनी विविध विषयांवर पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधला. उपनिरीक्षक ते उपअधीक्षक दर्जाचे अधिकारी या विशेष प्रशिक्षणात सहभागी झाले होते. विधानसभा निवडणूक मुक्त व निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी पोलिसांना निवडणूक प्रक्रिया, आयोजन, त्यांची कर्तव्ये व जबाबदाऱ्यांबाबत नियम व कायद्यांची जाण असणे आवश्यक आहे. यासाठी या विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. निवडणूक काळात पोलीस अधिकाऱ्यांवर विविध प्रकारची जबाबदारी असते. संवेदनशील मतदान केंद्र शोधणे, कायदा व सुव्यवस्था राखणे, निवडणुकीपूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई, निवडणुकीवर पैसा व दबावतंत्राचा प्रभाव पडणार नाही, याची दक्षता घेणे आदी कामे करावी लागतात. दलात नवीन नियुक्ती अथवा आणि ज्यांना बढती मिळाली, त्याना निवडणुकीसाठी अधिकारी म्हणून नवीन जबाबदारी आहे, अशा सर्वांना या प्रशिक्षणाचा लाभ होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

हे वाचले का?  “जेवढं गोडी गुलाबीने घ्याल तेवढं तुमच्यासाठी…”, मनोज जरांगेंचा फडणवीसांना पुन्हा इशारा