पनामा कालव्याद्वारे होणाऱ्या व्यापाराला बदलत्या हवामानाचा फटका

पनामामधील ऐतिहासिक दुष्काळ, समुद्राच्या पाण्याचे वाढते तापमान यामुळे प्रशांत आणि अटलांटिक महासागरांना जोडणाऱ्या पनामा कालव्यामधील वाहतूक मंदावली आहे.

वृत्तसंस्था, लॉस एंजेलिस : पनामामधील ऐतिहासिक दुष्काळ, समुद्राच्या पाण्याचे वाढते तापमान यामुळे प्रशांत आणि अटलांटिक महासागरांना जोडणाऱ्या पनामा कालव्यामधील वाहतूक मंदावली आहे. कालव्याच्या पाण्याचे संवर्धन करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी त्यातून मालवाहतुकीचे कमाल वजन तसेच जहाजांच्या फेऱ्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे व्यापाऱ्यांना फटका बसत आहे.

हे वाचले का?  Gautam Adani Fraud: गौतम अदाणींनी कंत्राट मिळविण्यासाठी २,००० कोटी रुपयांची लाच दिली; अमेरिकेत गुन्हा दाखल, शेअर बाजार गडगडला

नवीन नियमांमुळे जहाज मालकांसमोर वाहतुकीच्या मालाचे वजन कमी करणे अथवा हजारो मैलांचा प्रवास वाढवणारा पर्यायी मार्ग निवडणे किंवा वाट पाहणे असे तीन पर्याय उपलब्ध आहेत. सद्यस्थितीत काही जहाजांना तब्बल २१ दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. जगातील ८० टक्के मालवाहतूक पनामा कालव्यातून होते. गेल्या वर्षी १४ हजारांपेक्षा जास्त जहाजांची या मार्गाने वाहतूक झाली होती. पनामा कालवा अधिकाऱ्यांनी घातलेल्या निर्बंधांमुळे अमेरिका आणि चीनच्या जहाजांच्या मालवाहतुकीचा खर्च जवळपास ३६ टक्क्यांनी वाढला आहे, असे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.

हे वाचले का?  पैसे दामदुपटीच्या आमिषाने दोनशे कोटी रुपयांना फसवणूक, लासलगाव पोलिसांत गुन्हा

 तर स्थिती आणखी गंभीर

समुद्राच्या पाण्याचे तापमान सामान्यपेक्षा बरेच जास्त असल्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कारण अशा परिस्थितीत टोकाचे हवामान अनुभवायला मिळू शकते असे हवामान तज्ज्ञ सांगत आहेत. पुढील वर्षीही पनामामध्ये कमी पावसाचा इशारा देण्यात आल्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर होईल असा इशारा तज्ज्ञ देत आहेत.

हे वाचले का?  Violence in Manipur : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, इम्फाळ जिल्ह्यात हायटेक ड्रोनने हल्ला; दोन जणांचा मृत्यू, १० जण गंभीर जखमी