परिस्थिती १९९० पेक्षाही भयनाक असल्याचं सांगत काश्मीर खोऱ्यातून सरकारी कर्मचारी, स्थानिकांचं मध्यरात्री पलायन

काश्मीर खोऱ्यातील कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या बँक कर्मचाऱ्यांच्या हत्येनंतर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी उच्चस्तरीय बैठक घेतली

जम्मू-काश्मीरमध्ये मागील काही दिवसांपासून होत असणाऱ्या हिंदू पंडितांच्या हत्यांच्या घटनांमुळे येथील स्थानिक हिंदू पंडितांच्या कुटुंबियांनी आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांनी काश्मीरच्या खोऱ्यामधून पलायन करण्यास सुरुवात केलीय. गुरुवारी रात्रीच अनेक खासगी वाहनांमधून केंद्र सरकारच्या योजनांसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबरोबरच अनेक स्थानिक काश्मिरी पंडितांची कुटुंबं जम्मूच्या दिशेने झाली. आज पहाटे हे कर्मचारी आणि स्थानिक काश्मिरी पंडीत जम्मूमध्ये दाखल झाले. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून हत्यासत्र सुरूच आहे. जिवाच्या भीतीने काश्मिरी पंडित व हिंदू नागरिक काश्मीर खोऱ्यातून बाहेर पडण्याची धडपड करत असून स्थानिक प्रशासनकडे सुरक्षा पुरवण्याच्या मागणीसाठी त्यांनी निदर्शनेही केली. तर काहींनी थेट पलायन केलं आहे.

हे वाचले का?  Crime News : ट्यूशनवरुन घरी पतरणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, बेशुद्धावस्थेत सापडली मुलगी, कुठे घडली घटना?

कुलगाममध्ये गुरुवारी दहशतवाद्यांनी एका बँक व्यवस्थापकाची हत्या केली. दहशतवाद्यांनी १ मेपासून काश्मीरमध्ये केलेली ही आठवी हत्या असून, या हत्यासत्राचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. काश्मीर खोऱ्यातील कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या बँक कर्मचाऱ्यांच्या हत्येनंतर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी उच्चस्तरीय बैठक घेतली. अमरनाथ यात्रेआधी काश्मीरमधील हत्यांमुळे केंद्र सरकारची चिंता वाढली आहे.

काश्मीरचं खोरं सोडून जम्मूमध्ये दाखल होण्यासंदर्भातील निर्णयाबद्दल बोलताना काश्मीरच्या खोऱ्यातून पलायन केलेल्या अजय नावाच्या स्थानिकाने एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना काश्मीरमधील परिस्थिती फारच भयानक असल्याचं मत व्यक्त केलंय. “आजची काश्मीरमधील परिस्थिती ही १९९० पेक्षा भयानक आहे. सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे आम्हा लोकांना आमच्याच कॉलीनीमध्ये का डांबून ठेवण्यात आलं आहे? प्रशासन आपलं अपयश का लपवण्याचा प्रयत्न करतंय?”, असा सवाल उपस्थित केलाय.

हे वाचले का?  समुद्रातून डिझेल तस्करी करणारी टोळी जेरबंद; रायगडच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

स्थानिकच नाही तर केंद्र सरकारच्या योजनांअंतर्गत काम करणाऱ्यांनीही काश्मीर खोऱ्यामधून पलायन केलं आहे. “येथील परिस्थिती अधिक वाईट झाली आहे. आजच या ठिकाणी चार हत्या झाल्यात. ३० ते ४० कुटुंबं शहर सोडून निघून गेलीय. आमच्या मागण्या पूर्ण करण्यात आला नाही. सरकारने उभारलेल्या सुरक्षा छावण्या या शहरामध्येच आहेत. श्रीनगरमध्ये कोणतीही जागा सुरक्षित नाही,” असं पंतप्रधान योजनेसाठी काम करणारा कर्मचारी अतुल कौल याने एएनआयशी बोलताना सांगितलं.

“इथे सुरक्षा कर्मचारीही सुरक्षित नाहीत तर सर्वसामान्यांना ते सुरक्षित आहेत असं कसं वाटणार? अजून काही कुटुंबं शहर सोडून जाणार आहे. काश्मिरी पंडितांसाठीच्या छावण्या पोलिसांनी सील केल्यात,” असं अशू नावाच्या व्यक्तीनं एएनआयशी बोलताना सांगितलं.