परीक्षेनंतर शाळांमध्ये लसीकरण सत्र

परीक्षांमुळे पालकांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने शहरात करोनाविरोधी लसीकरण कमी प्रमाणात राहिले. परंतु परीक्षा संपल्यानंतर शाळेत लसीकरण सत्र राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा लसीकरणविषयक अधिकारी डॉ. किरण भोये यांनी दिली.

नाशिक : परीक्षांमुळे पालकांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने शहरात करोनाविरोधी लसीकरण कमी प्रमाणात राहिले. परंतु परीक्षा संपल्यानंतर शाळेत लसीकरण सत्र राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा लसीकरणविषयक अधिकारी डॉ. किरण भोये यांनी दिली.
करोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. १२ ते १४ वर्षे वयोगटाचे लसीकरण पूर्ण करण्याकडे सध्या विशेष लक्ष दिले जात आहे. जिल्ह्यात नाशिक शहर, मालेगाव शहराची लसीकरण टक्केवारी कमी असताना ग्रामीण भागात ७० टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण झाले आहे. शहर परिसरात परीक्षा असल्यामुळे लसीकरणात मागे असले तरी ही कसर भरून काढण्यासाठी परीक्षा संपल्यानंतर लसीकरण सत्रावर मोठय़ा प्रमाणावर भर देण्यात येणार आहे. करोना नियंत्रणात लसीकरणाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत आहे. लसीकरणाच्या पाचव्या टप्पात १२ ते १४ वर्षे वयोगटाचे लसीकरण करण्यात येत आहे. जिल्ह्यात दोन लाख, २१ हजार ८४२ बालकांना लसीकरण होणे अपेक्षित आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात एक लाख १३ हजार २०२ बालकांचे लसीकरण झाले आहे. नाशिक महापालिका हद्दीत केवळ २६०९८, मालेगाव महापालिका हद्दीत पाच हजार ९०९ असे एक लाख ४५ हजार २०९ बालकांचे लसीकरण झाले आहे.
याविषयी जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. किरण भोये यांनी माहिती दिली. नाशिक आणि मालेगावात लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. उलट ग्रामीण भागात अधिक प्रतिसाद मिळत आहे. १२ ते १४ वयोगटात नाशिक जिल्ह्याचे ६५ टक्के लसीकरण झाले आहे. परीक्षांमुळे पालकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळू शकला नसल्याचे त्यांनी सांगितले.

हे वाचले का?  पैसे दामदुपटीच्या आमिषाने दोनशे कोटी रुपयांना फसवणूक, लासलगाव पोलिसांत गुन्हा