पाऊस परतण्याचा मागावर, पण उन्हाचे चटके असह्य

मराठवाडा, विदर्भासह राज्याच्या इतर भागांतून पावसाने विश्रांती घेतली आहे. तरीही कोकण आणि गोव्यालगत असणाऱ्या काही भागांमध्ये मात्र तो पुन्हा एकदा बरसणार आहे.

नागपूर : पाऊस परतीच्या मागावर असतानाच मागील काही दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागामध्ये उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. सकाळ आणि दुपारच्या वेळी तापमानात होणारी वाढ पाहता हवामान खात्याकडूनही नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. जाता जाता पाऊस राज्यातील काही भागात बसरणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. 

हे वाचले का?  आठव्या माळेला भवानी तलवार अलंकार महापूजा; आज होमहवन, पूर्णाहुती उद्या घटोत्थापन

मराठवाडा, विदर्भासह राज्याच्या इतर भागांतून पावसाने विश्रांती घेतली आहे. तरीही कोकण आणि गोव्यालगत असणाऱ्या काही भागांमध्ये मात्र तो पुन्हा एकदा बरसणार आहे. कोकणातील किनारपट्टीनजीकच्या काही भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरी बरसण्याची शक्यता आहे. तर मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतही काही तासांसाठी पावसाची रिमझिम पाहायला मिळू शकते. दरम्यान, मागील काही दिवसांपासून हवेतील गारवा काहीसा कमी झाला असून, राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये दुपारचे तापमान ३५ अंशांवर पोहोचले आहे. हवामानात होणाऱ्या या बदलांचे थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे.

हे वाचले का?  कोकण किनाऱ्यावर कमी दाबाचा पट्टा; कोकण व गोवामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळणार