पाकिस्तानातून आलेल्या ड्रोणमध्ये स्फोटके

सीमेलगतच्या घग्गर व सिंघोक खेडय़ांमधील शेतांमध्ये शोध घेतला असता बीएसएफच्या पथकाला दोन पिवळय़ा रंगाची पाकिटे ओल्या मातीत फसलेली आढळली.

पाकिस्तानातून आलेल्या एका ड्रोनमधून दोन पाकिटांमध्ये पंजाब सीमेवरील एका शेतात टाकलेले चार किलोग्रॅमहून अधिक आरडीएक्स, एक पिस्तूल व बॉम्ब तयार करण्याचे साहित्य सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) बुधवारी जप्त केले.

हे वाचले का?  Russia Attack On Ukraine : रशियाचा युक्रेनवर पुन्हा क्षेपणास्र हल्ला, पोल्टावामधील लष्करी शिक्षण संस्थेला केलं लक्ष्य; ५० जणांचा मृत्यू, २७१ जखमी

 दुपारी १ वाजताच्या सुमारास गुरदासपूर सेक्टरच्या पंजग्रेन भागात पाकिस्तातून भारतीय बाजूला येणाऱ्या संशयित उडत्या वस्तूचा आवाज ऐकल्यानंतर बीएसएफच्या जवानांनी त्याच्यावर गोळीबार केला, असे या निमलष्करी दलाच्या एका प्रवक्त्याने सांगितले. यानंतर सीमेलगतच्या घग्गर व सिंघोक खेडय़ांमधील शेतांमध्ये शोध घेतला असता बीएसएफच्या पथकाला दोन पिवळय़ा रंगाची पाकिटे ओल्या मातीत फसलेली आढळली. या पाकिटांमध्ये अमली पदार्थ असावेत असे आधी वाटले, मात्र ती उघडली असता ४.७ किलो आरडीएक्स, एक चिनी बनावटीचे पिस्तूल, २२ काडतुसांसह दोन मॅगझीन, तीन इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर, टायमर उपकरण इत्यादी वस्तूंसह १ लाख रुपये रोख सापडले, असे हा प्रवक्ता म्हणाला. सीमेवरील कुंपणापासून भारतीय हद्दीत सुमारे २.७ किलोमीटर आत ही पाकिटे टाकणारे ड्रोन नंतर पाकिस्तानात परत गेल्याचा संशय आहे.

हे वाचले का?  Harini Amarasuriya : हरिनी अमरसूर्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान; भारताशी आहे खास कनेक्शन