पाणी पुरवठा योजनेसाठी सौरऊर्जा प्रकल्पांची गरज

सिन्नर तालुक्यातील अनेक गावांचा प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेत समावेश झालेला आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला खासदार हेमंत गोडसे यांची सूचना

नाशिक : सिन्नर तालुक्यातील अनेक गावांचा प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेत समावेश झालेला आहे. परंतु, जमा होणारी पाणीपट्टी आणि वीज देयक यात मोठी तफावत असल्याने वीज देयकांची थकबाकी वाढून गावाच्या पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा वारंवार खंडित होत असतो. या संकटापासून मुक्तीसाठी गाव शिवारातील मोकळय़ा जागांवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा पर्याय खासदार हेमंत गोडसे यांनी मांडला आहे. त्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणालाही त्यांनी सूचना केली आहे.https://6517030f14a729f09c753c125cfcdde1.safeframe.googlesyndication.com/safeframe/1-0-38/html/container.html

गाव समुहाच्या प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेत पाणीपट्टी कमी आणि वीज थकबाकी अधिक असे चित्र असते. यामुळे पाणीपुरवठा समितीला वीज देयक भरणे शक्य होत नसल्याने देयक थकित होवून गावच्या पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा वारंवार खंडित होतो. सिन्नर तालुक्यातील मनेगावसह २३ गाव पाणीपुरवठा योजना, बारागाव िपप्रीसह सात गाव, ठाणगावसह सहा गाव, वावीसह ११ गाव, मिठसागरे पंचाळेसह १२ गाव, नायगावसह १० गाव, कणकोरीसह पाच गाव या पाणीपुरवठा योजनांचा प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेत समावेश झालेला आहे.

अव्वाच्यासव्वा येणारे वीज देयक आणि पाणीपट्टी स्वरुपात जमा होणारी रक्कम यामध्ये खुपच तफावत आहे. नळधारकांकडून पाणीपट्टी भरण्यास हलगर्जीपणा होत असल्याने पाणीपुरवठा समितीला वेळेत आणि संपूर्ण वीज देयक भरणे शक्य होत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस थकीत वीज देयकांची रक्कम वाढत जाते. वीज देयक थकल्याने  पाणीपुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा खंडित होण्याची कारवाई केली जाते.

यासंदर्भात ग्रामस्थांकडून आलेल्या तकारींची दखल घेत खासदार गोडसे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला विशेष पत्र पाठविले आहे. पाणी पुरवठा योजनेच्या अधिक येणाऱ्या वीज देयकांवर पर्याय म्हणून गावशिवारातील जागेवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात यावा, अशा सूचना  गोडसे यांनी प्राधिकरणाला केली आहे. यामुळे या समस्येवर कायमचा उपाय निघू शकेल. सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी निधी तसेच प्रशासकीय मान्यतेसाठी अडचणी निर्माण झाल्यास तात्काळ आपल्याशी संपर्क साधण्याचे निर्देशही गोडसे यांनी प्राधिकरण प्रशासनाला दिले आहेत. गोडसे यांच्या सुचनांची दखल घेत प्राधिकरणाने लगेचच प्रत्यक्ष कार्यवाही करण्यास सुरूवात केली आहे . प्राधिकरणाने मंगळवारी मनेगाव आणि बारागाव िपप्री येथील पाणीपुरवठा समितीकडून सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या जागेसंदर्भातील प्रस्तावाची मागणी केली आहे.