प्रेषित अवमान प्रकरण : भारतीय वेबसाईट्सवर परदेशातून सायबर हल्ले, सर्वात मोठा फटका महाराष्ट्राला; बँकाच्या वेबसाइट्स धोक्यात

एक दोन नाही तर तब्बल ७० भारतीय वेबसाईट्सवर हे सायबर हल्ले करण्यात आले आहेत.

प्रेषित मोहम्मद यांच्यासंदर्भात करण्यात आलेल्या अवमानकारक वक्तव्यावरुन अल-कायदा या दहशतवादी संघटनेनं भारतातील वेगवेगळ्या शहरांवर हल्ला करण्याची धमकी दिल्यानंतर आता देशातील वेगवेगळ्या सरकारी आणि खासगी वेबसाईट्सवर याच मुद्द्यावरुन सायबर हल्ले होताना दिसत आहेत. यामध्ये अगदी आहे. हॅक करण्यात आलेल्या अनेक वेबसाईट्सवर वादग्रस्त संदेश झळकत आहे. त्यात ‘आम्ही शांत बसणार नाही’, असा इशारा देण्यात आला आहे. धक्क्कादयक बाब म्हणजे याचा सर्वात मोठा फटका महाराष्ट्राला बसला असून राज्यातील ५० वेबसाईट्स हॅक झाल्यात.

ड्रॅगन फोर्स मलेशिया नावाच्या हॅकर्स ग्रुपने देशातील अनेक वेबसाईट्सवर हल्ले केलेत. यामध्ये इस्त्रायलमधील भारतीय दुतावासाच्या वेबसाईट, राष्ट्रीय शेती व्यवस्थापनाची वेबसाईट आणि कृषी संसोधन केंद्राच्या वेबसाईट्सचा समावेश आहे. या वेबसाईट्ससोबत इतरही अनेक वेबसाईटवर सायबर हल्ले करण्यात आले आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार एक दोन नाही तर तब्बल ७० भारतीय वेबसाईट्सवर हे सायबर हल्ले करण्यात आले आहेत.

हे वाचले का?  Maharashtra News Live : छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला, भेटीचं कारण काय? राजकीय चर्चांना उधाण

या गटाने सायबर हल्ला केलेल्या वेबसाइट्सच्या यादीमध्ये दिल्ली पब्लिक स्कूल, भवन्स आणि इतर शैक्षणिक संस्थांच्या वेबस्टाईसचा समावेश आहे. सायबर हल्ले करण्यात आलेल्या ७० पैकी ५० वेबसाईट्स या महाराष्ट्रातील आहेत. यापैकी अनेक वेबसाईट्सवर या हॅकर्सने ऑडिओ नोट पोस्ट केलीय. यामध्ये, “तुम्हाला ज्याप्रमाणे तुमचा धर्म आहे तसाच आमच्यासाठी आमचा धर्म आहे,” असं वाक्य ऐकू येत आहे.

या हॅकर्सने जगभरातील मुस्लीम हॅकर्सला भारतीय वेबसाईटवर सायबर हल्ले करण्यासाठी आवाहनही केलं आहे. मानवी हक्कांसाठी लढणाऱ्यांनीही या हल्ल्यामध्ये सहभागी व्हावं असं ड्रॅगन फोर्स मलेशियाने म्हटलंय. रविवारी रात्री उशीरा भारतातील इस्त्रायलच्या दुतावासाला वेबसाइट रिस्टोअर करण्यात यश आलं आहे. मात्र त्यावरील काही पेजेसवर अद्यापही तांत्रिक अडचणी कायम आहेत.

वर्ल्ड वाइड वेबवरील डिजिटल यंत्रणेवर तसेच इंटरनेटसंदर्भातील हलचालींवर लक्ष ठेवणाऱ्या वेबॅक मशीनने आठ जून ते १२ जून दरम्यान भारतीय सरकारी साइट्स तसेच खाजगी पोर्टल्स विस्कळीत झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलाय. भारतामधील अनेक बँकांच्या वेबसाईट्स हॅक करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता असा दावा सुरक्षा तज्ज्ञांनी केलाय. १३ हजारांहून अधिक सदस्य असलेल्या याच हॅकटिव्हिस्ट ग्रुपची भारतातील अनेक प्रमुख बँकांच्या वेबसाईटवर हल्ले केल्याचा दावा केला जातोय.

हे वाचले का?  Ladki Bahin Yojana Update: ‘लाडकी बहीण’ योजनेच्या नुसत्या प्रसिद्धीसाठी २०० कोटी मंजूर, काँग्रेसची आगपाखड; म्हणे, “ढोल पिटण्यासाठी…”!

असेच हल्ले ‘१८७७’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या दुसर्‍या हॅकर्स ग्रुपनेही केले होते. त्यांनी इतर पोर्टल्ससह महाराष्ट्रातील विधी अकादमीच्या वेबसाईटही हॅक केली आहे. या वेबसाईटवर या ग्रुपचा मेसेज असा होती की, “आम्हाला भारतीय लोकांशी कोणतीही अडचण नाही. ते त्यांचा धर्म निवडण्यास स्वतंत्र आहेत, पण आम्ही त्यांना आमच्या धर्मावर (इस्लाम) आक्रमण करू देणार नाही”. आकडेवारी दर्शविते की जून-जुलै २०२१ मध्ये देखील, ‘ड्रॅगनफोर्स’ने इस्त्रायली सरकारच्या वेबसाइट्सवर अनेक हल्ले केले होते.

“हे राजकीयदृष्ट्या प्रेरित हॅकर्स असून आणि त्यांना देशांचा छुपा पाठिंबा असतो. असे हल्ले हे भविष्यात डेटा चोरी आणि बँकिंग आणि गंभीर पायाभूत सुविधांवरील रॅन्समवेअर हल्ले होऊ शकतात असं सूचित करतात. सर्व सरकारी आणि खाजगी क्षेत्रांनी सायबर सुरक्षा यंत्रणा मजबूत करावी. जेव्हा त्यांनी इस्रायली साइट्सवर हल्ला केला तेव्हा त्यांनी इस्रायली कंपन्यांचा वैयक्तिक डेटा, पासपोर्ट डेटा आणि व्हीपीएन क्रेडेन्शियल्स लीक केले होते. आपण येत्या काही दिवसांमध्ये आणखी सायबर हल्ल्यांसाठी तयारी केली पाहिजे,” असे एका सायबर सुरक्षा तज्ञाने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले.

हे वाचले का?  राज्यातील ‘या’ प्रसिद्ध धरणाचे नाव बदलले, आता ‘आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय’ म्हणून ओळखले जाणार

असेही संशय आहे की डेटा लीक करण्याबरोबरच आणि डिस्ट्रिब्युटेड डिनायल-ऑफ-सर्व्हिसचा प्रयत्न (डॉस हल्ला – वेब मालमत्ता असणाऱ्या बेवसाईट्सवर सामान्य ट्रॅफिकमध्ये व्यत्यय आणण्याचा जाणीवपूर्वकपणे केलेला प्रयत्न) अनेक भारतीय सरकारी आणि खाजगी साइटवर देखील झालाय.