बससेवेस नाशिककरांचा प्रतिसाद

लवकरच शहरभर जाळे पसरणार

लवकरच शहरभर जाळे पसरणार

नाशिक : टाळेबंदीचा एकेक टप्पा सैल होऊ लागल्याने राज्य परिवहनने सहा ते सात महिन्यांपासून बंद असलेली शहर बससेवा अलीकडेच काही ठरावीक मार्गावर सुरू के ली. प्रारंभी तुरळक असणारा प्रवाशांचा प्रतिसाद दिवसागणिक वाढू लागला आहे. आतापर्यंत १६०० हून अधिक प्रवाशांनी बससेवेचा लाभ घेतला आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार लवकरच शहर परिसरात अन्य ठिकाणीही बससेवा सुरू करण्यात येणार आहे.

करोना महामारीमुळे मार्चमध्ये प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली. टाळेबंदीच्या काळात केवळ परप्रांतीय मजूर, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या क्षेत्रातील व्यक्तींची वाहतूक अशी सेवा राज्य परिवहनकडून सुरू होती. या काळात प्रवासी वाहतूक बंद होती.

हे वाचले का?  नाशिक फाटा-खेड महामार्गासाठी ८ हजार कोटी; केंद्राकडून महत्त्वाकांक्षी ८ प्रकल्पांना मंजुरी  

टाळेबंदी शिथिल होऊ लागल्यानंतर राज्य परिवहननेही बससेवेला मर्यादित स्वरूपात सुरुवात के ली. पहिल्या टप्प्यात परजिल्हा, दुसऱ्या टप्प्यात आंतर जिल्हा बससेवा सुरू करण्यात आली. परंतु शहर बससेवा बंदच होती. त्यामुळे ज्यांच्याकडे स्वत:चे वाहन नाही अशा नाशिककरांची गैरसोय होत होती. रिक्षातून प्रवास करणे खिशाला परवडणारे नव्हते. त्यामुळे शहर बससेवा सुरू करण्यासाठी दबाव वाढत होता. त्यामुळे सात दिवसांपूर्वी शहर बससेवा मर्यादित स्वरूपात सुरू करण्यात आली.

पहिल्या दिवशी पाचशेहून अधिक प्रवाशांनी लाभ घेतला. हळूहळू प्रवाशांचा प्रतिसाद वाढू लागला. पंचवटी, नाशिक रोड, उत्तमनगर या ठिकाणच्या फे ऱ्यांना अधिक प्रतिसाद मिळू लागला.

हे वाचले का?  नाशिक : शिक्षण हे परिवर्तनाचे माध्यम, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे प्रतिपादन

सात दिवसांत प्रवासी संख्या एक हजार ६४६ वर पोहोचली असून मंगळवारपासून भगूर येथेही दोन फे ऱ्या सुरू करण्यात आल्या. सध्या १२ बस धावत असून ९० हून अधिक फे ऱ्या करण्यात येत आहेत. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहनकडून सर्व प्रकारची दक्षता घेण्यात येत आहे.

प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बस निर्जंतुकीकरण करण्यात येते. तसेच वाहक, चालक आणि अन्य कर्मचाऱ्यांसाठी सॅनिटायझरचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महामंडळ प्रयत्नशील असून प्रवाशांमध्ये प्रवासाविषयी आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे आगार व्यवस्थापक शुभांगी शिरसाठ यांनी सांगितले. प्रवाशांच्या मागणीनुसार शहरातील अन्य भागातही बससेवा सुरू करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद के ले.