बातमी तुमच्या कामाची: भारतीय गुंतवणूकदारांना NSE प्लॅटफॉर्मवरून अमेरिकन शेअर्स खरेदी-विक्री करता येणार

गेल्या काही वर्षात शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. आता शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी खूशखबर आहे.

गेल्या काही वर्षात शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. आता शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी खूशखबर आहे. NSE IFSC ला निवडक अमेरिकन स्टॉक्समध्ये गुंतवणूक करता येणार आहे. यासाठी आवश्यक मंजुरी मिळाली आहे. एनएसई आयएफएससी एएसईचं आंतराष्ट्रीय एक्सचेंज आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये, NSE इंटरनॅशनल एक्स्चेंजने जाहीर केले की निवडक यूएस स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करणे NSE IFSC प्लॅटफॉर्मद्वारे सुलभ केले जाईल. गुंतवणूकदार या प्लॅटफॉर्मद्वारे यूएस स्टॉक खरेदी करू शकतील. या प्लॅटफॉर्मवर ५० स्टॉक खरेदी विक्रीची परवानगी देण्यात आली आहे.

हे वाचले का?  Israel Iran War: इराण-इस्रायल संघर्ष चिघळणार? भारतीय दूतावासांकडून भारतीयांसाठी ॲडव्हायजरी जारी

भारतीय किरकोळ गुंतवणूकदार NSE IFSC च्या प्लॅटफॉर्मद्वारे लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम (LRS) मर्यादेअंतर्गत व्यवसाय करण्यास सक्षम असतील. LRS ची तरतूद आरबीआयने केली आहे. NSE IFSC नुसार, या प्लॅटफॉर्मद्वारे आंतरराष्ट्रीय गुंतवणूक खूप सोपी होईल आणि त्याची किंमतही जास्त नसेल. या प्लॅटफॉर्मवर गुंतवणुकदारांना अंशात्मक प्रमाणात गुंतवणूक करण्याची सुविधाही असेल.

५० स्टॉक्सपैकी ८ स्टॉक्स ३ मार्चपासून ट्रेडिंगसाठी उपलब्ध होतील. या स्टॉकमध्ये अल्फाबेट इंक (गुगल), अॅमेझॉन इंक, टेस्ला इंक, मेटा प्लॅटफॉर्म्स (फेसबुक), मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन, नेटफ्लिक्स, ऍपल आणि वॉलमार्ट यांच्या नावांचा समावेश आहे. हे सर्व अमेरिकेचे प्रसिद्ध शेअर्स आहेत. उर्वरित शेअर्सची खरेदी विक्री करण्याची तारीख लवकरच जारी केली जाणार आहे. या प्लॅटफॉर्मवर अमेरिकन स्टॉकची ट्रेडिंग, क्लिअरिंग, सेटलमेंट आणि होल्डिंगची संपूर्ण प्रक्रिया IFSC प्राधिकरणाच्या नियामक फ्रेमवर्क अंतर्गत पूर्ण केली जाईल.

हे वाचले का?  इस्रायलवरील हल्ल्याची वर्षपूर्ती; पूर्वसंध्येला लेबनॉन लक्ष्य, तर हेझबोलाकडूनही प्रतिहल्ला!