बारामतीत बेरजेचं राजकारण! अजित पवार-शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील भेटीनंतर चर्चेला उधाण

साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. ही भेट मतदारसंघातील कामासंदर्भात होती असे सांगून या बाबत अधिक बोलण्यास शिवेंद्रसिंहराजे यांनी नकार दिला. शिवेंद्रसिंहराजे यांनी या भेटी संदर्भात अधिक माहिती दिलेली नसली, तरी बारामतीतून बेरजेचं राजकारण सुरु झाल्याची चर्चा आहे.

आज सकाळी अजित पवार यांच्या भेटीसाठी शिवेंद्रसिंहराजे बारामतीतील विद्या प्रतिष्ठान संकुलातील व्हीआयआयटीमध्ये हजर झाले. बंद खोलीमध्ये अजित पवार यांच्याशी त्यांनी पंधरा मिनिटे चर्चा केली. त्या नंतर माध्यमांनी त्यांना गाठले असता त्यांनी फक्त मतदारसंघातील कामासाठी आलो होतो, त्यात वेगळे नव्हते असे सांगून ते तेथून निघून गेले.

हे वाचले का?  Shivsena : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर केली शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी, बंडात साथ दिलेल्या किती आमदारांना संधी?

अजित पवार यांच्याशी या पूर्वीही शिवेंद्रसिंहराजे यांनी मतदारसंघातील कामासंदर्भात चर्चा केलेली होती, त्यामुळे आज त्यांच्या भेटीने पुन्हा काही नवीन राजकीय समीकरणे उदयाला येणार की फक्त मतदारसंघातील कामाबाबतच ही भेट होती या बाबत कार्यकर्त्यांतही चर्चा सुरु झाली आहे.

सातारा जिल्हा बँक व सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात ही त्यांची चर्चा असू शकते. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यापूर्वी नुकतीच पुणे-मुंबई येथे अजित पवार यांची भेट घेतली आहे. मागील काही दिवसातील त्यांची ही तिसरी भेट आहे. साताऱ्यातील विकासकामांच्या अनुषंगाने त्यांची वाढती जवळीक हा राजकीय चर्चेचा विषय झाला आहे

हे वाचले का?  Maharashtra Election 2024 : यवतमाळमध्ये महायुती वर्चस्व कायम राखणार का ?