बोटिंग क्लब लवकरच सर्वासाठी सुरू होणार

बोटिंग क्लब लवकरच सर्वासाठी सुरू होणार

पर्यटन महामंडळाचा दावा;  कलाग्रामचे काम अजूनही रखडलेले

नाशिक : शहरातील पर्यटनाचे आकर्षण असलेले गंगापूर धरण परिसरातील बोिंटंग क्लब लवकरच सुरू होणार असल्याचा दावा पर्यटन विभाग करत असला तरी करोना संसर्गामुळे अद्याप कलाग्राम,

कन्व्होके शन सेंटरसह अन्य उपक्र म रखडले आहेत. निधी परत गेल्याने पर्यटन महामंडळापुढे कामाच्या अडचणी वाढल्या आहेत. अशा स्थितीत बोटिंग कसे सुरू होणार याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्य़ातील पर्यटनाला चालना मिळावी यासाठी तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून शहरात नवीन संकल्पनांवर काम झाले. त्यात पर्यटन महामंडळाच्या मदतीने गंगापूर धरण परिसरात बोटिंग क्लब, बचत गटांना हक्काची बाजारपेठ मिळावी यासाठी कलाग्राम, साहसी क्रीडा केंद्र, गोदा आरती अशा वेगवेगळ्या उपक्र मांचा आरंभ झाला.

हे वाचले का?  सप्तश्रृंग गड रस्त्यावरील खड्ड्यांमुळे भाविकांचे हाल

यामध्ये पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय असलेला बोटिंग क्लब महत्त्वाचा प्रकल्प होता. परदेशातून वेगवेगळ्या प्रकारच्या ४० बोटी मागविण्यात आल्या. बोटिंग क्लबच्या उद्घाटनासाठी चंदेरी दुनियेतील झगमगत्या ताऱ्यांना आमंत्रित करण्यात आले; परंतु त्या वेळी पर्यावरणवादी संघटनांनी या प्रकल्पाला विरोध के ला. तत्कालीन सरकार पायउतार झाले. सरकार बदलल्याने पुन्हा एकदा बोटिंग क्लबचे तत्कालीन पर्यटनमंत्री जयकु मार रावल यांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले; परंतु पाणीटंचाई, पर्यावरणवादी संघटनांचा विरोध पाहता पर्यटकांसाठी बोटिंग खुले झाले नाही. उलट येथील ४० पैकी काही बोटी या सारंगखेडा येथे होणाऱ्या चेतक उत्सवासाठी पाठविण्यात आल्या होत्या. याविषयी आवाज उठविल्यानंतर बोटी परत आल्या. बोटी दुरुस्तीसाठी होणारा खर्च पाहता हा प्रकल्प पर्यटन महामंडळाला डोईजड होत असताना बोटी ज्या ठिकाणी ठेवण्यात येत होत्या, ते ठिकाण मंगल कार्यालयासाठी खुले करण्यात आले.

हे वाचले का?  भुसावळ – सुरत रेल्वेसेवा विस्कळीत, चिंचपाडा स्थानकात रेल्वे रुळावर मातीचा भराव, मालवाहू गाडी रुतली

दुसरीकडे, कलाग्राम प्रकल्पाचे काम दिल्लीच्या हाट बाजारच्या धर्तीवर सुरू करण्यात आले. सात वर्षांहून अधिक काळापासून हे काम रखडले आहे. साहसी कला क्रीडा केंद्राचे कामही अद्याप पूर्ण झालेले नाही. अशा वेगवेगळ्या अडचणींना तोंड देत पर्यटन महामंडळ काम करत आहे.

त्यातच करोना महामारीमुळे सर्व कामे रखडली असताना प्रकल्पासाठी आलेला निधी परत गेला आहे. टाळेबंदीचे नियम शिथिल होत असताना बोटिंग क्लबही खुले करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. लवकरच बोटिंग क्लब सर्वासाठी खुला होईल, असा दावा महामंडळ करत आहे.