बोधचिन्हाचे अनावरण

निवड समितीने कोल्हापूर येथील अनंत खासबारदार यांचे बोधचिन्ह आणि घोषवाक्याची निवड केली आहे.

शहरातील गोखले शैक्षणिक संस्थेच्या आवारात होणाऱ्या ९४व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. निवड समितीने कोल्हापूर येथील अनंत खासबारदार यांचे बोधचिन्ह आणि घोषवाक्याची निवड केली आहे. राज्यभरातून ५६ जणांनी बोधचिन्ह आणि घोषवाक्य पाठविले होते.

या बोधचिन्ह आणि घोषवाक्याचे अनावरण मराठा विद्या प्रसारक समाजाच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी संस्थेचे सभापती माणिकराव बोरस्ते, संचालक डॉ. जयंत पवार, जयप्रकाश जातेगावकर, दिलीप साळवेकर, संजय करंजकर आदी उपस्थित होते. निवड समितीत वास्तुविशारद संजय पाटील, चित्रकार राजेश सावंत, कल्पक योजनाकार आनंद ढाकीफळे, लेखक दत्ता पाटील, लेखक प्राजक्त देशमुख यांचा समावेश होता.

हे वाचले का?  ५० कोटींच्या कर्जांसाठी लाखोंचा खर्च, प्रदीर्घ काळापासून एकच लेखा परीक्षक – मविप्र वार्षिक सभेत गोंधळ

साहित्याचा प्रवास हा अनंताकडून अनंताकडे प्रवाहित होणारा असल्याचे बोधचिन्हात दाखविण्यात आले आहे. पुस्तकाच्या पानातून पुढे प्रवासत जात गोदावरीच्या चैतन्यदायी प्रवाहात, अनंताकडून ग्रंथाकडे आणि ग्रंथातून नदी प्रवाहाच्या माध्यमाद्वारे लोकसंस्कृती, सामाजिक जाणिवा समृद्ध करत अनंताकडे जाणाऱ्या लाटा असे बोधचिन्हात आहे. तसेच बोधचिन्हात सामाजिक क्रांती आणि नव्या सूर्योदयसमयीच्या क्षितिजाचे प्रतीक आहे. सतत उगम पावणाऱ्या साहित्याचे प्रतिबिंब बोधचिन्हात उमटत आहे.

हे वाचले का?  अजित पवार गटाकडून आमदारांना संधी, चार जणांना एबी अर्ज, तिघे बाकी

शुद्धलेखनाच्या चुका

अखिल भारतीय साहित्य मराठी साहित्य संमेलनानिमित्त तयार करण्यात आलेल्या बोधचिन्हाच्या आशयाची माहिती देणारे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले. त्यात शुद्धलेखनाच्या चुका आहेत. अखिल ऐवजी आखिल झाले. महत्त्वाचा शब्द चुकला असून महत्त्व असे जोडाक्षर हवे.