भारतातील १.६ कोटी लोकांना करोना लसीचा दुसरा डोस मिळणे अद्याप बाकी

१२ आठवड्यांनंतर आणि अद्याप पूर्णपणे लसीकरण झाले नाही अशा दुसर्‍या डोससाठी पात्र असलेल्या लोकांची संख्या ३.९ कोटी आहे.

भारतातील किमान १.६ कोटी लोकांना त्यांच्या करोना लसीच्या पहिल्या डोसच्या १६ आठवड्यांनंतरही लसीचा दुसरा डोस मिळणे अद्याप बाकी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये एक कोटीपेक्षा जास्त वृद्ध आहेत. बाकीचे इतर आरोग्य आणि फ्रंन्टलाईन कर्मचारी आणि ४५ वर्षांपेक्षा जास्त वय असणारे  आहेत. १.६ कोटींचा आकडा २ मे, म्हणजे १६ आठवड्यांपूर्वी किती लोकांना पहिला डोस मिळाला होता हे पाहून आणि आतापर्यंत दुसरा डोस मिळवलेल्या एकूण लोकांशी तुलना करून काढला गेला. सर्व आकडेवारी आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून समोर आली आहे.

१३ मे रोजी, सरकारने कोविशिल्डसाठी १२-१६ आठवड्यांचे अंतर ठेवण्याची मान्यता दिली होती.  जी सर्व लसीकरणांपैकी ८५ टक्के पेक्षा जास्त आहे. कोव्हॅक्सिनसाठी हे अंतर ४ ते ६ आठवडे आहे. ज्या लोकांचा दुसरा डोस दिलेल्या वेळेपेक्षा उशीरा झाले आहेत त्यांची संख्या जास्त असू शकते कारण १६ आठवड्यांची आकडेवारी ही कोविशिल्डसाठीच्या १६ आठवड्यांवर आधारित आहे आणि कोव्हॅक्सिनसाठीच्या सहा आठवड्यांवर नाही. म्हणूनच, ज्यांना आतापर्यंत दोन्ही डोस मिळाले आहेत त्यांच्यामध्ये २ मे नंतर पहिला डोस मिळवलेल्या अनेकांचा समावेश आहे.

हे वाचले का?  Jharkhand : झारखंडमध्ये आजी-माजी मुख्यमंत्री आघाडीवर, JMM आणि भाजपामध्ये अटीतटीची लढत!

१२ आठवड्यांनंतर आणि अद्याप पूर्णपणे लसीकरण झाले नाही अशा दुसर्‍या डोससाठी पात्र असलेल्या लोकांची संख्या ३.९ कोटी आहे. सरकारी आकडेवारीनुसार, आरोग्य सेवा आणि फ्रंन्टलाईन कर्मचारी गटांतील, ४५-५९ वर्षे आणि ६० वर्षांवरील १२८ कोटी व्यक्तींना २ मे रोजी पहिला डोस मिळाला होता. यापैकी ११.२ कोटींना दुसरा डोस मिळाला आहे.

एक कोटी ६० पैकी ४५-५९ वयोगटातील सुमारे ४५ लाख, १२ लाख लक्षणे नसलेले आरोग्य कर्मचारी आणि १.८ लाख फ्रंटलाईन कर्मचारी यांना २ मे पर्यंत पहिला डोस मिळाला आहे. तर त्यांना सोमवारपर्यंत दुसरा डोस मिळालेला नाही. आरोग्य आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना म्हणजेच ज्यांना संसर्गाचा अधिक धोका आहे आणि ४५ पेक्षा जास्त वय असणाऱ्या आणि वृद्धांना प्राधान्य देण्यासाठीच्या लसीकरणासाठी कोविन प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात येणार होता. मात्र जे अपेक्षित होते त्याच्या उलट असल्याचे दिसून येते.

हे वाचले का?  PM Modi calls Biden: पंतप्रधान मोदींचा बायडेन यांना फोन; युक्रेन दौरा आणि बांगलादेशमधील हिंदूंच्या सुरक्षिततेवर चर्चा

१८-४४ वयोगटातील लोकांसाठी, लसीकरण १ मे पासून सुरु करण्यात आले होते. या वयोगटातील ८६,००० हून अधिक लोकांना २ मे रोजी पहिला डोस मिळाला. सोमवारपर्यंत त्यापैकी १.९४ कोटींपेक्षा जास्त लोकांना त्यांचा दुसरा डोस मिळाला आहे. १८ पेक्षा जास्त वय असणाऱ्या लोकसंख्येपैकी, ४८ टक्के लोकांना कमीतकमी एक डोस मिळाला आहे, पण केवळ १४ टक्के लोकांना दोन्ही मिळाले आहेत.

हे वाचले का?  ५६वा व्याघ्रप्रकल्प लवकरच, छत्तीसगडमध्ये देशातील तिसरा मोठा प्रकल्प