भारतीय हद्दीतून जाणाऱ्या इराणच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी; दिल्लीत उतरण्याची परवानगी मागितली पण…

इराणमधील एका प्रवासी वाहतूक विमानात बॉम्ब असल्याच्या दाव्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

इराणमधील एका प्रवासी वाहतूक विमानात बॉम्ब असल्याच्या धमकीनंतर एकच खळबळ उडाली आहे. हे विमान इराणहून चीनच्या दिशेने जात आहे. मात्र भारतीय हवाई हद्दीत आल्यानंतर या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाली आहे. भारताने या विमानाला दिल्लीत उतरण्यास परवानगी नाकारली असून भारतीय हवाई दल सतर्क झाले आहे. सुरक्षा यंत्रणांकडून या विमानावर लक्ष ठेवलं जातंय.

हे वाचले का?  SBI Fake Branch : चित्रपटाला शोभेल अशी कथा! चक्क SBI ची बनावट शाखा सुरू केली, खोट्या नियुक्त्या अन् बरंच काही; कुठे घडला हा भयंकर प्रकार?

मिळालेल्या माहितीनुसार इराणमधील एका प्रवासी वाहतूक विमानात बॉम्ब असल्याचा दावा केला जातोय. हे विमान इराणहून चीनकडे जात होते. मात्र भारतीय हवाई हद्दीत आल्यानंतर या विमानात बॉम्ब असल्याचा माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली. त्यानंतर या विमानाला दिल्ली विमानतळावर उतरण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. हे विमान आता चीनच्या दिशेने रवाना झाले आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणा या विमानावर लक्ष ठेवून आहेत.

हे वाचले का?  टाटा ट्रस्टला मिळाले नवे चेअरमन! रतन टाटांनंतर कुटुंबातील ‘या’ सदस्याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी

जयपूरला विमान उतरवण्यास वैमानिकाचा नकार

हे विमान इराणमधील तेहरान येथून चीनमधील गुआंगझोऊ येथे जात होते. मात्र विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर महान एअरने विमान दिल्लीत उतरवण्यासाठी परवानगी मागितली. दिल्ली पोलीस तसेच विमानतळ प्रशासनाने ही परवानगी नाकारत विमान जयपूरच्या विमानतळावर उतरवण्याची सूचना केली. वैमानिकाने विमान जयपूरला उतरवण्याचा नकार देत भारताची हवाई हद्द सोडली आहे. सध्या हे विमान चीनच्या दिशेने जात आहे.

हे वाचले का?  Fraud Supreme Court : बनावट सर्वोच्च न्यायालय, बोगस सरन्यायाधीश अन् खोटा निकाल… सायबर ठगांचा व्यावसायिकाला सात कोटींचा गंडा