भूसंपादनासाठी एकरी १६ कोटी द्यावे लागले तर राज्यात रस्ते, विमानतळ होणे अशक्य – गडकरी

नाशिक येथील कार्यक्रमात बोलून दाखवलं ; पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक असल्याचेही सांगितले.

“महाराष्ट्र सरकारचा जमिनीचा रेट मध्यतंरी १६ कोटी रुपये एकर आमच्यासाठी होता. तुमच्या सरकारने नाही अगोदरच्या सरकारने केला होता (छगन भुजबळ यांना उद्देशून) तेव्हा माझ्या विभागाने कामच करणं बंद केलं होतं. आता १६ कोटी रुपये एकर जर रेट दिला तर कुठून मी रस्ते बांधणार? म्हणून मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आणि त्यांनी आता विचार केला. पुढील आठवड्यात १३ ऑक्टोबर रोजी आमची बैठक आहे. त्यातून ते मार्ग काढणार आहे. कारण, शेवटी मर्यादा असते तुम्ही जर १६ कोटी रुपये रेट घेतला तर रस्ते, विमानतळ, रेल्वे मार्ग काहीच होणार नाही.” असं केंद्रीय वाहतूक मंत्री  नितीन गडकरी म्हणाले आहेत. नाशिकमध्ये १६७८ कोटी किंमतीच्या २०६ किमी लांब १२ NH प्रकल्पांचा उद्घाटन आणि पायाभरणी कार्यक्रमात ते बोलत होते.

हे वाचले का?  अनुसूचित जमातींमधून आरक्षणासाठी धनगर समाजाचे आंदोलन

या अगोदर बोलाताना गडकरींनी सांगितले की, “आम्ही एक नवीन ग्रीन अलांयनमेंट केली आहे व हा रस्ता देशातील एक प्रमुख रस्ता होणार आहे. हा रस्ता नाशिकवरून जाणार असल्याने, तो आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. हा सुरत ते चेन्नई हा ग्रीनफील्ड एक्स्प्रेस हायवे जवळपास ५० हजार कोटींचा रस्ता आहे. याची रचना निश्चित झालेली आहे आणि याला डीपीआर देखील पूर्ण होत आलेला आहे. एका इकॉनॉमिक कॉरिडॉर सुरत, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, अक्कलकोट, करमुल आणि पुढे चेन्नईमध्ये जाणार आहे. पुढे कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेश व तामिळनाडू चारही ठिकाणी या रस्त्याचा उपयोग होणार आहे. सध्या सुरत ते चेन्नई हे अंतर १६०० किलोमीटर आहे. हा रस्ता बनल्यानंतर हे अंतर १२७० किलोमीटर म्हणजे ३३० किलोमीटर कमी होणार आहे. हा संपूर्ण ग्रीन अलांयमेंट आहे, सध्या रस्ता अस्तित्वात नाही. यामुळे इंधन बचत होणार आहे, जड वाहनांसाठी प्रवास सुखकारक राहणार आहे. याची अंदाजे किंमत जवळपास ६० हजार कोटी आहे. याचं काम आम्ही लवकरच सुरू करणार आहोत.”

हे वाचले का?  अजित पवार गटाकडून आमदारांना संधी, चार जणांना एबी अर्ज, तिघे बाकी

तसेच, “या प्रकल्पात एकूण लांबी १२२ किलोमीटर नाशिक जिल्ह्यामधून जाते. म्हणून या १२२ किलोमीटर लांबीचा उपयोग नवीन नाशिकच्या विकासात कसा करता येईल, याचा विचार जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने छगन भुजबळ आपण, महापौर व सर्व आमदार, खासदारांनी करावा. कारण, यामध्ये आम्ही जवळपास ९८० हेक्टर जमीन आम्ही या महामार्गासाठी संपादित करणार आहोत.” अशी देखील गडकरी यांनी माहिती दिली.

हे वाचले का?  Sharad Pawar NCP 5th Candidate List : मोठी बातमी! शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पाचवी यादी जाहीर; माढा मतदारसंघात दिली ‘या’ नेत्याला उमेदवारी