मजूराच्या मुलीने मोडला चालण्याचा विक्रम

सुवर्णपदकाची कमाई

मुंबईमध्ये बांधकामावर मजुराचं काम करणाऱ्याच्या मुलीनं चालण्याचा नवीन राष्ट्रीय विक्रम केला आहे. मुळची उत्तर प्रदेशमधील असणारी मुनिता प्रजापती हिनं २० वर्षाखालील महिलांच्या १० हजार मीटर चालण्याची स्पर्धा जिंकत राष्ट्रीय विक्रम केला आहे. ३६ व्या राष्ट्रीय ज्यूनिअर एथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली.

हे वाचले का?  Olympics 2024 : भारताला आज तीन पदकांची आशा; महाराष्ट्राचा नेमबाज अंतिम फेरीत, चालण्याच्या स्पर्धेत तिघांची फायनलमध्ये धडक

मुनिता प्रजापती हिनं ४७ मिनिट ५४ सेकंदात दहा हजार मीटर चालण्याचा पराक्रम केला. प्रजापतीनं रेश्मा पटेल हिला (४८ मिनिट २५ सेकंद) हिला पराभवूत करत अव्वल स्थान पटाकवलं आहे. गेल्या महिन्यात वाराणसी येथे झालेल्या स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळाला होता. या स्पर्धेत पटेल हिला सुवर्णपदक मिळालं होतं.

हे वाचले का?  ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या जन्मगावी क्रीडा संकुलासाठी अखेर २५.७५ कोटींचा निधी मंजूर