‘मनुस्मृती, रामचरितमानस हे द्वेष पसरविणारे ग्रंथ’, बिहारच्या मंत्र्यांच्या वक्तव्यानंतर नवा वाद; हिंदू संघटनांकडून जीभ छाटण्यासाठी बशीस जाहीर

‘रामचरितमानस, मनुस्मृती द्वेष पसरवितात, जाळून टाका’, बिहारच्या मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य

बिहार राज्याचे शिक्षण मंत्री चंद्रशेखर यांनी बुधवारी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. “मनुस्मृतू, रामचरितमानस आणि बंच ऑफ थॉट्स सारखे ग्रंथ जाळून टाकले पाहीजेत. या ग्रंथानी द्वेष पसरविण्याचे काम केले आहे. लोकांना अनेक पिढ्या मागे रेटण्याचे काम केले.”, असे वक्तव्य केल्यानंतर आता बिहार आणि देशभरातील हिंदू संघटनांकडून त्यांचा विरोध करण्यात येत आरहे. अयोध्यामधील संत जगद्गुरु परमहंस आचार्य यांनी तर चंद्रशेखर यांची जीभ छाटण्यासाठी दहा कोटींचे बक्षीस जाहीर केले आहे.

शिक्षण मंत्री चंद्रशेखर यांनी बुधवारी नालंदा येथील मुक्त विद्यापीठाच्या १५ व्या दीक्षांत समारभांत बोलत असताना सदर वक्तव्य केले. ते म्हणाले, “देशातल्या जातींनी समाज जोडण्याचे नाही तर तोडण्याचे काम केले आहे. याममध्ये प्रामुख्याने मनुस्मृती, गोस्वामी तुलसीदास रचित रामचरितमानस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक माधव गोळवलकर लिखित बंच ऑफ थॉट्स या पुस्तकांनी ८५ टक्के लोकांना अनेक पिढ्या मागे नेण्याचे काम केले.”

हे वाचले का?  जागतिक बँकेची भारतावर स्तुतिसुमनं; अध्यक्ष म्हणाले, “इथपर्यंत पोहोचण्यासाठी भारतानं खूप प्रयत्न केल्याचं दिसतंय”!

तसेच ते पुढे म्हणाले, “या ग्रंथामुळे देशाचे राष्ट्रपती आणि मुख्यमंत्री यांना मंदिरांमध्येही जाण्यापासून रोखले गेले. हे ग्रंथ द्वेषाची पेरणी करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथाचा विरोध केला. त्यांनी मनुस्मृतीला जाळण्याचे काम केले. तसेच रामचरितमानस या ग्रंथावर देखील डॉ. आंबेडकरांनी टीका केली आहे. शिक्षणाचा अधिकार मिळाल्यानंतर खालच्या जातीतील लोक विषारी होतात. एका युगात मनुस्मृती, दुसऱ्या युगात रामचरितमानस तथा तिसऱ्या युगात बंच ऑफ थॉट्सने समाजात फक्त द्वेषच पसरविला. कोणताही देश द्वेषाने नाही तर प्रेमाने महान बनू शकतो.”

हे वाचले का?  Jammu and Kashmir Exit Polls 2024: जम्मू-काश्मीरमध्ये भरघोस मतदान, आता सत्ता कुणाची? Exit Poll कधी येणार?

चंद्रशेखर यांची जीभ छाटणाऱ्यास १० कोटींचे बक्षीस

मंत्री चंद्रशेखर यांच्या वक्तव्यानंतर अयोध्यामधील संत जगद्गुरु परमहंस आचार्य यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. चंद्रशेखर यांच्या वक्तव्यामुळे समस्त देशातील हिंदूच्या भावनांना तडा गेला आहे. हा सनातन्यांचा अपमान आहे. या वक्तव्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहीजे. तसेच एका आठवड्याच्या आत त्यांनी माफी न मागितल्यास त्यांची जीभ छाटणाऱ्याला आम्ही १० कोटींचे बक्षीस देण्याची घोषणा करु, असे आवाहन परमहंस आचार्य यांनी केले.

हे वाचले का?  Mithun Chakraborty Dadasaheb Phalke Award : मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर, सिनेसृष्टीतील योगदानाबाबत गौरव