मराठा आरक्षण आंदोलकांकडून पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध

पोलिसांनी आंदोलकांना घरीच नजरकैदेत ठेवले

पोलिसांनी आंदोलकांना घरीच नजरकैदेत ठेवले

नाशिक : राष्टवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार बुधवारी नाशिक दौऱ्यावर असताना मराठा आरक्षणावरून कोणी गोंधळ घालू नये, म्हणून शहर पोलिसांनी मराठा समाज आंदोलकांवर करडी नजर ठेवत त्यांना घरीच नजर कैदेत ठेवल्याने आंदोलकांनी पोलिसांच्या या दडपशाहीचा तीव्र निषेध के ला.

माजी मंत्री विनायकदादा पाटील यांचे नुकतेच निधन झाले. विनायकदादांशी जवळीक असल्याने त्यांच्या कु टुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी बुधवारी सकाळी शरद पवार हे नाशिकमध्ये दाखल झाले. दरम्यान, मंगळवारी मराठा आरक्षणावरून राज्यात सुरू असलेला गोंधळ पाहता पवार यांच्या दौऱ्यात मराठा समाजाकडून आंदोलन, घोषणाबाजी किं वा अन्य काही गैरकृत्य घडेल या शंके ने धास्तावलेल्या शहर पोलिसांनी मराठा आरक्षण आंदोलन समन्वय समितीत असलेले राजू देसले, करण गायकर, गणेश कदम, तुषार जगताप यांना मंगळवारीच नोटिसा बजावल्या. समन्वयकांकडून काही गैरकृत्य घडले किं वा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून गैरकृत्य घडल्यास त्यांना जबाबदार धरत  गुन्हे दाखल होतील, असा इशारा देण्यात आला. बुधवारी सकाळपासून त्यांना त्यांच्या घरीच नजरकै द करण्यात आले. याशिवाय त्यांचे दूरध्वनीवरील संभाषणही नोंदविण्यात आल्याची तक्रोर आंदोलकांनी के ली. पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी आयुक्तपदाचा पदभार घेतांना मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करणार नाही, आंदोलक सहकार्य करणार असतील तर पोलिसांचेही सहकार्य राहील, असे आश्वासन दिले होते. परंतु पवार यांचा दौरा निश्चित होताच आयुक्तांना विधानाचा विसर पडला.

हे वाचले का?  भुसावळ – सुरत रेल्वेसेवा विस्कळीत, चिंचपाडा स्थानकात रेल्वे रुळावर मातीचा भराव, मालवाहू गाडी रुतली

मराठा समाजाचे आंदोलक सुशिक्षित आहेत. आंदोलन कु ठे आणि के व्हा करावे याची माहिती त्यांना आहे. कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा पोहचेल अशी कु ठलीही कृती ते करणार नाहीत, असा विश्वास राजू देसले यांनी व्यक्त के ला. दरम्यान, पोलिसांच्या दडपशाही वृत्तीचा निषेध करण्यात आला.