महाराष्ट्रात आज ३ हजार ६१२ रुग्ण करोनामुक्त, रिकव्हरी रेट ९४ टक्के

आत्तापर्यंत राज्यात एकूण १८ लाखांपेक्षा जास्त रुग्ण करोनामुक्त

महाराष्ट्रात आज ३ हजार ६१२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत एकूण १८ लाख २८ हजार ५४६ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.६४ टक्के इतके झाले आहे. आज महाराष्ट्रात ३ हजार ५०९ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर मागील २४ तासांमध्ये ५८ मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

हे वाचले का?  अहमदनगरची अक्षता जाधव अबॅकस परीक्षेमध्ये राज्यात दुसरी

महाराष्ट्रात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी २७ लाख ४७ हजार ६३३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९ लाख ३२ हजार ११२ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यातील मृत्यूदर हा सध्या २.५६ टक्के इतका आहे. सध्या राज्यात २ लाख ८१ हजार ३०३ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ३ हजार ५७८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. आज घडीला राज्यात ५२ हजार ९०२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज राज्यात ३ हजार ५०९ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील करोना रुग्णांची एकूण संख्या १९ लाख ३२ हजार ११२ इतकी झाली आहे.