महाराष्ट्राला निश्चित साठय़ापेक्षा अधिक लसमात्रा

केंद्र सरकारचा प्रतिज्ञापत्राद्वारे दावा, ऑगस्ट महिन्यात ९१.८१ लाख लसमात्र उपलब्ध

केंद्र सरकारचा प्रतिज्ञापत्राद्वारे दावा, ऑगस्ट महिन्यात ९१.८१ लाख लसमात्र उपलब्ध

मुंबई : महाराष्ट्राला ऑगस्ट महिन्यात निश्चित केलेल्या ८६ लाख ७४ हजार लसमात्रांपेक्षा अधिक म्हणजेच ९१ लाख ८१ हजार मात्रा उपलब्ध करून देण्यात आल्या, असा दावा केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्राद्वारे उच्च न्यायालयात के ला आहे.

राज्य सरकारने लस तुटवडय़ाची तक्रोर के ल्याची दखल घेत न्यायालयाने केंद्र सरकारकडून लशींच्या वितरणाचा तपशील मागवला होता. त्यावर प्रतिज्ञापत्र दाखल करताना केंद्र सरकारने राज्याला ऑगस्ट महिन्यात निश्चित लससाठय़ापेक्षा अधिकचा साठा उपलब्ध करून दिल्याचा दावा केला.

राज्याला ऑगस्ट महिन्यात ८६ लाख ७४ हजार ५४० मात्रा उपलब्ध करून देण्यात येणार होत्या. परंतु त्याऐवजी राज्याला ९१ लाख ८१ हजार ७९० लसमात्रा उपलब्ध करून दिल्या. त्यात कोव्हिशिल्डच्या ७६ लाख ८६ हजार २५० लसमात्रा व कोव्हॅक्सिनच्या १४ लाख ९५ हजार ५४० लसमात्रांचा समावेश होता. त्याचप्रमाणे ९१.८१ लाख लसमात्रांपैकी ८४.७४ लाख लसमात्रा या वेळेवर वा वेळेआधीच राज्याला देण्यात आल्या. कोव्हिशिल्डच्या लसमात्रा २९ ऑगस्टला देण्यात येणार होत्या, त्या पाच दिवस आधीच देण्यात आल्या. तर कोव्हॅक्सिनच्या लसमात्रा पूर्वनियोजनानुसार, २५ ऑगस्टला देण्यात आल्या, असा दावाही केंद्र सरकारने केला.

हे वाचले का?  Maharashtra Breaking News Live : धनगर आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; अजित पवार गट नाराज? म्हणाले, “आम्हाला विश्वासात घ्यायला हवं होतं”

देशात ७५ टक्के लसमात्रांचे उत्पादन केले जाते. तसेच लोकसंख्या, करोनास्थिती आणि लसीकरणाची गती या निकषांच्या आधारे हा साठा राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांना उपलब्ध करून दिला जातो. लस उत्पादनाला आणि देशातील लस उत्पादन कं पन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या कंपन्यांना थेट खासगी रुग्णालयांना २५ टक्के लससाठा उपलब्ध करून देण्याचा पर्यायही देण्यात आला आहे, असेही केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

हे वाचले का?  Manoj Jarange : “बेगडी उपोषण करण्यापेक्षा…”, आंदोलन स्थगित करताना मनोज जरांगे असं का म्हणाले?

प्रकरण काय?

लशींचे वितरण कधी केले जाणार आणि राज्याला किती लशी मिळणार याबाबत आगाऊ माहिती दिली जात नसल्याची तक्रोर सरकारने के ली होती. मात्र तक्रारीत तथ्य नसल्याचा दावा केंद्र सरकारने मागील सुनावणीच्या वेळी केला होता. शिवाय राज्यांना लशींचा व्यवस्थित पुरवठा व्हावा यावा यासाठी वितरणाचे आगाऊ वेळापत्रक तयार करण्यात आल्याचेही सांगितले होते. न्यायालयाने मात्र लस उत्पादकांकडून लशींच्या कुप्या कशा व किती प्रमाणात घेतल्या जातात तसेच सर्व राज्यांना त्याचे वितरण कशाप्रकारे व किती प्रमाणात केले जाते याचा तपशील सादर करण्याचे आदेश केंद्र सरकारला दिले.

राज्यात करोनाचे ४,१९६ नवे रुग्ण

राज्यात दिवसभरात ४,१९६ नव्या रुग्णांची नोंद झाली तर १०४  जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात ४,६८८ रुग्ण करोनामुक्त झाले असून उपचाराधीन रुग्णांची संख्या ५१ हजार २३८ इतकी आहे.  गेल्या २४ तासांत मुंबई येथे ३२३, रायगड ८०, अहमदनगर ७८०, पुणे जिल्हा ५७९, पुणे शहर २७७, पिंपरी-चिंचवड १६३, सोलापूर ३५८, सातारा ४०८, कोल्हापूर ६७, सांगली २१४, रत्नागिरी ११४, बीड येथे ९४ रुग्णांची नोंद झाली.

हे वाचले का?  Ladki Bahin Yojana : ॲप आणि संकेतस्थळ बंद, लाडकी बहीण योजनेचा अर्ज कसा भराल? जाणून घ्या सोपी प्रक्रिया!