महिला आशिया चषक फुटबॉल स्पर्धा पुढील वर्षी भारतात

तीन गटांत संघांची विभागणी करण्यात आली असून १८ दिवस २५ सामने खेळवण्यात येणार आहेत.

महिलांची आशिया चषक फुटबॉल स्पर्धा पुढील वर्षी २० जानेवारी ते ६ फेब्रुवारीदरम्यान भारतात रंगणार असल्याची माहिती गुरुवारी आशियाई फुटबॉल महासंघाने (एएफसी) दिली.

गेल्या वर्षी ही स्पर्धा आठ संघांमध्ये खेळवण्यात आली होती. यंदा त्यात १२ संघांचा समावेश करण्यात आला आहे. तीन गटांत संघांची विभागणी करण्यात आली असून १८ दिवस २५ सामने खेळवण्यात येणार आहेत. आठ संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील. या स्पर्धेद्वारे आशियातील पाच संघांना २०२३च्या ‘फिफा’ महिला विश्वचषक स्पर्धेत थेट पात्र ठरण्याची संधी मिळणार आहे.