मान्सूनचे ९० टक्के अंदाज चुकलेच! २५ जून नंतर तीव्र गतीने सक्रीय

८ जून ते २१ जून पर्यंत मान्सून सर्वत्र सक्रीय होईल, त्यानंतर २५ जून नंतर अनेक मान्सून तीव्र गतीने प्रवेश करेल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

नागपूर : भारतीय हवामान खात्यासह खासगी हवामान संस्था व अभ्यासकांनी मान्सूनच्या आगमनाबाबत केलेले दावे चुकले. आता १८ जून ते २१ जून पर्यंत मान्सून सर्वत्र सक्रीय होईल, त्यानंतर २५ जून नंतर अनेक मान्सून तीव्र गतीने प्रवेश करेल, असा अंदाज खात्याने दिला आहे.

हे वाचले का?  Maharashtra News Live : छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला, भेटीचं कारण काय? राजकीय चर्चांना उधाण

चार जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाचा अंदाज व्यक्त केला असताना ते उशिरा झाले. चक्रीवादळामुळे मान्सूनची गती कमी झाली आणि महाराष्ट्रात मान्सून पूर्णपणे पोहोचलाच नाही. अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळाने रौद्र रुप धारण केल्यामुळे अनेक राज्यांना धोका निर्माण झाला आहे. भारतात अनेक ठिकाणी मान्सूनसाठी अनुकूल वातावरण तयार होत असल्यामुळे अनेक राज्यात मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

हे वाचले का?  Maharashtra Breaking News Live : धनगर आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; अजित पवार गट नाराज? म्हणाले, “आम्हाला विश्वासात घ्यायला हवं होतं”