मिनी सरस प्रदर्शनातून, 52 लाखांची उलाढाल

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या उमेद अभियानातंर्गत येथे आयोजित मिनी सरस प्रदर्शनाचा बुधवारी समारोप झाला. पाच दिवस चाललेल्या प्रदर्शनातून 52लाख रुपयांपेक्षा अधिक आर्थिक उलाढाल झाली.
नाशिक : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या उमेद अभियानातंर्गत येथे आयोजित मिनी सरस प्रदर्शनाचा बुधवारी समारोप झाला. पाच दिवस चाललेल्या प्रदर्शनातून 52लाख रुपयांपेक्षा अधिक आर्थिक उलाढाल झाली. दुसरीकडे, प्रदर्शनात सहभागी झालेल्या बचत गटांना बाहेरील व्यावसायिकांशी जोडण्यासाठी आयोजित बैठक वेळेअभावी पुढे ढकलण्यात आली.

हे वाचले का?  तयार मालाच्या निर्यातीवर भर; कच्च्या मालाचे मूल्यवर्धन करण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

उमेद अभियानांतर्गत विविध वस्तू, खाद्यपदार्थ, गृहोपयोगी साधन सामग्रीच्या वस्तु निर्मितीसाठी महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यात येते. या अंतर्गत ११ ते १५ जानेवारी या कालावधीत डोंगरे वसतिगृह मैदानात मिनी सरस प्रदर्शन भरवण्यात आले होते. प्रदर्शनात महिला बचत गटांकडून निर्मित वस्तुंचे तसेच खाद्यपदार्थांची १०३ दालने होती. उमेद अभियानांतर्गत जिल्ह्यात विविध वस्तुंच्या ११ नाममुद्रा तयार करण्यात आल्या असून सदर बचत गटांची दालनेही प्रदर्शनात होती. प्रदर्शनास पाच हजारांहून अधिक नाशिककरांनी भेट दिली.

हे वाचले का?  Nashik Kumbh Mela : नाशिकमध्ये ४०० एकरवर साधुग्राम, कुंभमेळ्यात साधूमहंतांना निवासासाठी हक्काची जागारायगड व नाशिक

दरम्यान, प्रदर्शन ठिकाणी विक्रेता-खरेदीदार बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी शहर तसेच जिल्ह्यातील १९ व्यापाऱ्यांना निमंत्रण देण्यात आले होते. महिला बचत गटांनी तयार केलेली उत्पादने, कच्चा माल एकत्रित खरेदीसाठी ही बैठक बोलावण्यात आली. मात्र काही कारणास्तव ही बैठक झाली नाही. हॉटेल व्यावसायिक तसेच औषध कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.