यापूर्वी ते नांदेडस्थित स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात प्र-कुलगुरू होते.
नाशिक: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदाचा कार्यभार प्रा. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी स्वीकारला. यापूर्वी ते नांदेडस्थित स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात प्र-कुलगुरू होते.
प्रा. बिसेन यांचे शिक्षण एम. ए., एम. फिल., पी. एच. डी., बी.पी. एड. असून, मागील २७ वर्षे लातुरच्या दयानंद कला महाविद्यालयात हिंदी विषयाचे प्राध्यापक व नंतर प्राचार्य राहिले आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाच्यावतीने महाराष्ट्र राज्य हिन्दी साहित्य अकादमीचा छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय एकता पुरस्कार आणि इतरही अनेक सन्मान प्राप्त झालेले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० च्या अंमलबजावणीसाठी शासनाच्यावतीने गठीत सुकाणू समितीचे ते सदस्य आहेत.
मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी कुलगुरू प्रा. सोनवणे यांनी विद्यापीठाविषयी आणि विविध नवीन उपक्रम व अभ्यासक्रमांबद्दल माहिती दिली. प्रा. बिसेन यांच्या अनुभवाचा मुक्त विद्यापीठास नक्कीच उपयोग होईल अशी आशा व्यक्त केली. प्र-कुलगुरू प्रा. बिसेन यांनी आपण पारंपरिक विद्यापीठातून आलो असलो तरी, मुक्त विद्यापीठाबद्दल सर्व जाणून घेत जास्तीत योगदान कसे देता येईल आणि विद्यापीठाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करेल, अशी भावना व्यक्त केली.