मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष नाशिक जिल्ह्याकडे विशेष म्हणजे शहराकडे अधिक आहे.
नाशिक: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष नाशिक जिल्ह्याकडे विशेष म्हणजे शहराकडे अधिक आहे. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारताच त्यांनी शहराच्या विकासाला प्राधान्य देत कामाला सुरुवात केली आहे. पहिल्या झटक्यात महापालिका आयुक्तांची बदली केली, असा टोला राष्ट्रवादीचे नेते तथा माजी पालकमंत्री आ. छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.
मुख्यमंत्री शिंदे हे शनिवारी नाशिकऐवजी मालेगाव येथे विभागीय बैठक घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर येथे पत्रकारांशी संवाद साधताना भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष सर्वत्र असल्याचे सांगितले. सत्तांतराप्रसंगी काही आमदार शिंदे गटात गेले. त्यामुळे ज्या ठिकाणचे आमदार त्यांच्या समवेत गेले, त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करण्याचे त्यांनी ठरविले असेल, असे भुजबळ यांनी सांगितले.