भाजपात नेत्याच्या पायाला स्पर्श करावा लागतो, नरेंद्र मोदी किंवा अमित शहा यांच्यापुढे वाकावे लागते.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची टीका
चेन्नई : तमिळनाडूचे मुख्यमंत्री ई पलानीस्वामी यांना खाली वाकून पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करायला सांगितले गेले. अशाप्रकारे मुख्यमंत्र्यांना नतमस्तक होण्यास भाग पाडलेले पाहणे असह्य आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रविवारी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली. चेन्नई येथे एका प्रचारसभेत ते बोलत होते.
राहुल गांधी पुढे म्हणाले, निवडून आलेल्या प्रतिनिधीने अमित शहा यांच्या पायाला स्पर्श करताना मी पाहिले. भाजपात नेत्याच्या पायाला स्पर्श करावा लागतो, नरेंद्र मोदी किंवा अमित शहा यांच्यापुढे वाकावे लागते. अशाप्रकारे पंतप्रधान तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांवर नियंत्रण ठेवताना पाहणे स्वीकारण्यास मन तयार होत नाही. तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना भ्रष्टाचारामुळे अमित शहा यांच्यापुढे असे नतमस्तक व्हावे लागत आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा सक्त अंमलबजावणी संचालनालय आणि केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) यांना नियंत्रित करतात. त्यामुळे त्यांच्यासमक्ष एखाद्या मुख्यमंत्र्यांना नतमस्तक व्हावे लागते. ज्याला इतकी मोठी भाषा आणि परंपरा आहे अशा राज्याच्या मुख्यमंत्र्यांने पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्या पाया पडताना पाहणे मला असह््य झाले आहे, असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले.