मोठी बातमी! अमेरिकेचा सीरियातील इराणी सैन्यावर हल्ला, कारण सांगत म्हणाले…

अमेरिकेने सीरियातील इराणी सैन्याच्या दोन ठिकाणांवर हवाई हल्ला केला आणि ते उद्ध्वस्त केले.

अमेरिकेने सीरियातील इराणी सैन्याच्या दोन ठिकाणांवर हवाई हल्ला केला आणि ते उद्ध्वस्त केले. ही दोन्ही ठिकाणं इराणमधील इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्स आणि इराणचा पाठिंबा असलेल्या गटांची होती. इराक आणि सीरियात अमेरिकन सैनिकांवर वांरवार होणाऱ्या हल्ल्यानंतर हे पाऊल उचलल्याचं अमेरिकेने सांगितलं.

अमेरिकेने आधी इराणचा पाठिंबा असलेले काही सशस्त्र गट अमेरिकन सैनिकांवर हल्ला करत असल्याचा आरोप केला होता. अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉईड ऑस्टिन गुरुवारी (२६ ऑक्टोबर) म्हणाले होते, “अमेरिकेला कोणताही संघर्ष नको आहे. मात्र, इराणचा पाठिंबा असलेल्या गटांकडून अमेरिकेच्या सैनिकांवर हल्ले होत आहे. ते अस्विकार्ह आहे आणि थांबवले पाहिजेत.”

हे वाचले का?  मोदी, बायडेन द्विपक्षीय चर्चा; हिंदप्रशांत सागरी प्रदेशासह जागतिक आणि प्रादेशिक मुद्दे उपस्थित

“आम्ही त्यांना सोडणार नाही”

“इराण अमेरिकन सैन्यावरील या हल्ल्यांमध्ये त्यांचा सहभाग लपवू इच्छित आहे. मात्र, आम्ही त्यांना सोडणार नाही. जर इराणचा पाठिंबा असलेल्या या गटांकडून हल्ला होत राहिला, तर आम्ही आमच्या लोकांचं संरक्षण करण्यासाठी पुढील पाऊल उचलण्यासाठी संकोच करणार नाही,” असा इशारा ऑस्टिन यांनी दिला होता.

हेही वाचा : इस्रायल-हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचा मोठा निर्णय, ब्रिगेडियर जनरल रायडर म्हणाले…

हे वाचले का?  Harini Amarasuriya : हरिनी अमरसूर्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान; भारताशी आहे खास कनेक्शन

“या हल्ल्यांचा इस्रायल-हमास युद्धाशी संबंध नाही”

यावेळी अमेरिकेने या हल्ल्यांचा इस्रायल-हमास युद्धाशी संबंध नसल्याचंही स्पष्ट केलं. ऑस्टिन म्हणाले, “अमेरिकेच्या सैनिकांवर हल्ला करणारे गट वेगळे आहेत. तसेच सध्या चालू असलेल्या इस्रायल हमास युद्धाशी त्याचा संबंध नाही. यामुळे अमेरिकेची इस्रायल-हमास युद्धावरील भूमिका बदलणार नाही.”