मोठी बातमी! उत्तर महाराष्ट्रात ४ कोटी २८ लाखांचा गांजा जप्त

पोलिसांनी उत्तर महाराष्ट्रात अमली पदार्थांवर मोठी कारवाई केलीय. या कारवाईत तब्बल ४ कोटी २८ लाख रुपयांचा ५ हजारहून अधिक किलो गांजा जप्त करण्यात आला.

पोलिसांनी उत्तर महाराष्ट्रात अमली पदार्थांवर मोठी कारवाई केलीय. या कारवाईत तब्बल ४ कोटी २८ लाख रुपयांचा ५ हजारहून अधिक किलो गांजा जप्त करण्यात आला. याशिवाय ७ लाख रुपये किमतीच्या आसपास ब्राउन शुगर, सुमारे २ लाख रुपयांचा चरसही पोलिसांनी जप्त केला. गेल्या वर्षभरात या कारवाया करण्यात आल्या.

हे वाचले का?  उत्तर महाराष्ट्रात ६५ टक्के मतदान

मागील वर्षभरात पोलिसांनी उत्तर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये छापेमारी करत कारवाया केल्या. यात इतक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ हस्तगत झाल्यानं खळबळ उडालीय.

“पोलिसांकडून ५ जिल्ह्यांमध्ये मागील दीड महिन्यात विशेष मोहिम”

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “नाशिक विभागातील अहमदनगर, धुळे, नंदूरबार, जळगाव आणि नाशिक ग्रामीण या ५ जिल्ह्यांमध्ये मागील दीड महिन्यात विशेष मोहिम राबवण्यात आली. पोलिसांच्या विशेष पथकाचंही यात महत्त्वाचं योगदान आहे. २२ प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल आहेत. यात एकूण ३८ आरोपींचा समावेश आहे. या कारवाईत ४ कोटी ६० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. यात चरस, ब्राऊन शुगर, गांजासह चारचाकी, दुचाकी वाहनांचा समावेश आहे.”

हे वाचले का?  उत्तर महाराष्ट्रात ६५ टक्के मतदान

“एकूण ३६ पिस्तुल जप्त, ४८ आरोपींना अटक”

“पोलिसांच्या अवैध शस्त्रांस्त्रांवरील कारवाईत एकूण ३६ पिस्तुल जप्त करण्यात आलेत. या प्रकरणांमध्ये ४८ आरोपींना अटक करण्यात आली. या शस्त्रांचा मुख्य पुरवठादार असलेला आरोपी सतनाम सिंग यालाही अटक करण्यात आली. आरोपींकडून काही कार्तूस, मॅगेझीन्ससह दुचाकी आणि चारचाकी वाहनं जप्त करण्यात आली,” अशी माहिती पोलिसांनी दिली.

हे वाचले का?  उत्तर महाराष्ट्रात ६५ टक्के मतदान